अवैध दारूसह लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त :- ब्रह्मपुरी शहरात अवैध दारू तस्करी जोमात..... :- पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अवैध दारू तस्करी करणाऱ्या बारकाईने लक्ष..... :- अनेक मुकबीरांकडुन अवैध दारू तस्करी माहिती.... :- बाहेरच्या जिल्ह्यांतून छुप्या मार्गाने होत आहे दारू ची तस्कर... :- पोलिसांनी सात आरोपी ताब्यात घेतले..‌..#darubandi. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध दारूसह लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त :- ब्रह्मपुरी शहरात अवैध दारू तस्करी जोमात..... :- पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अवैध दारू तस्करी करणाऱ्या बारकाईने लक्ष..... :- अनेक मुकबीरांकडुन अवैध दारू तस्करी माहिती.... :- बाहेरच्या जिल्ह्यांतून छुप्या मार्गाने होत आहे दारू ची तस्कर... :- पोलिसांनी सात आरोपी ताब्यात घेतले..‌..#darubandi.

Share This
खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

कोरोनाच्या संक्रमण काळात जिथे माणूस माणसाला भेटण्यापासून दूर जात आहे मानवाला सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे लागत आहे तिथे मात्र दारूची तस्करी मात्र मोठ्या जोरात सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे . व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे . मात्र अवैध दारूची तस्करी मात्र मोठ्या जोरात  सुरू आहे.
         
अवैध दारू तस्करी करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करतांना दिसत आहेत.ब्रम्हपुरी पोलिसांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्या मुसक्या आवळण्याचा सपाटाच सुरू केले आहे.
   
परंतू अवैध दारू तस्करी करणारे छुप्या मार्गाने बाहेरील जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी केली जात आहे.चंन्दपुर जिल्हा हा भंडारा जिल्हा लगत असलेल्यांने तोरगाव मार्गने दारू तस्कर मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करत आहेत. तोरगाव  नाक्यांवर पोलिस चौकी गरज आहे.पण येथील पोलिस चौकी बंद असल्याने अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना हा मार्ग मोठा सोयी झाले आहे.आज मुकबीर यांच्या माहीती वरून डि.बी पथकाने अवैध दारू तस्करी करणाऱ्या बाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली.तोरगाव टि पॉईंट या ठिकाणी पवनी कडुन येणारी मारोती MH 31 CN 0556 येताना दिसुन आली.

तीलाज् थांबवण्याचा इशारा दिला पण चालकाने गाडी वळवून परत पवनी कडे पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडले व झडती घेतली असता देशी दारू निपा १७५० किमंत २,००,०००/- रूपये तसेच आरोपी जवळील दोन मोबाईल किमंत १०,००० /- रुपये मारोती गाडी ४,००,००० रुपये तसेच याच मोहीम दरम्यान २) होन्डा जेट्स कार MH 31 CN 1915 किमंत ४,५०,०००/- रुपये मध्ये १४४ नग देशी दारू निपा किमंत २८,८००/- रुपये ३)  मोसा क्र.MH 31 AT- 5099 किमंत ४५,००० रुपये २२२ नग देशी दारू किमंत ६४,४०० रुपये ४) होन्डा एक्टिवा MH 31 BT 8661 किमंत ४०,००० रुपये मध्ये २४८ नग देशी दारू किमंत २९,६०० सदर या कारवाईत आरोपी आदित्य वैरागडे वय १९ ,आवतारसिंग दुधानी वय ३१ ,बंडु मनीराम शेंडे वय ३५ ,धीरज आनंदराव दिघोरे वय ३३ ,रितिदेवी मिश्रा वय ४९ , सुषमा सुरज विखार वय ३० ,रजनी अनिल रामटेके वय ४० असे सात आरोपी ताब्यात घेऊन एकुण चारचाकी २ वाहने मो सा असा एकूण १२,३०,८०० रूपयांचा मुद्देमाल व अवैध दारू जप्त करण्यात आली.या सदर कारवाईत  पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कुष्णा रॉय, पो.ह खोब्रागडे,हेमके नापोशी,पोशी शिवनकर,कटाईत पोशी,भगत पोशी  यांनी केली.