लाखों रुपयांची अवैध दारूसह मुद्देमाल जप्त ⭕️ ब्रह्मपुरी पोलिसांनी लाखों रुपयांची अवैध दारू जप्त.... ⭕️चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ⭕️ब्रह्मपुरी शहरात लॉकडाउन असताना सूध्दा होत आहे अवैध दारू तस्करी. ‌‌⭕️पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे ब्रह्मपुरी शहरात अवैध धंदे चालू देणार नाही #darubandi. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लाखों रुपयांची अवैध दारूसह मुद्देमाल जप्त ⭕️ ब्रह्मपुरी पोलिसांनी लाखों रुपयांची अवैध दारू जप्त.... ⭕️चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ⭕️ब्रह्मपुरी शहरात लॉकडाउन असताना सूध्दा होत आहे अवैध दारू तस्करी. ‌‌⭕️पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे ब्रह्मपुरी शहरात अवैध धंदे चालू देणार नाही #darubandi.

Share This
खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केले आहे.पण अनेक दारू तस्कर या लॉकडाऊन चा फायदा घेत अवैधरित्या ब्रह्मपुरी शहरात दारू पुरवठा करताना दिसत आहेत.ब्रम्हपुरी पोलिस येथील डि.बी पथक अशा अवैध दारू तस्करी करणाऱ्या विरूद्ध चांगलीच धडक मोहीम सुरू करण्यात आली. 

नव्याने रुजु होताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी डी.बी.पथक बंद केले.पण काही दिवसांपूर्वी पुन्हा कुष्णा रॉय नापोशी यांनी मुकबीर यांच्या माहिती वरून या महिन्यात लाखों रुपयांची अवैध दारू जप्त केली. ब्रह्मपुरी पोलिसांना आज दि.११ ,७,२० ला मुकबीर कडुन गोपनीय माहिती मिळाली की तोरगाव कडून एक मोटार कार मधून अवैध दारू येणार आहे त्यावरून आम्ही डी. बि. पथकाचे पोहवा खोब्रागडे, नापोशी रॉय, पोशी अमोल, पोशि विजय, पोशी कटाईत, पोशि शिवणकर यांना पाचारण करून सदर टी पॉईंट वर नाकाबंदी लावण्यात आली. सदर वेळी एक पांढऱ्या रंगाची मोटार कार आढळून आली. तिला अडवून तपासणी केली असता सदर कार मध्ये खालील मुद्देमाल मिळून आला. सदर माल व गाडी जप्त करून खालील आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद केला.1) देशी दारूचे 20 बॉक्स नग 20,000 किंमत रु. 2,00,000 /-
२) मारुती कार क्र. MH 31G 5500
किंमत रू. 2,00,000 /-
एकूण की. रु. 4,00,000/-
आरोपीचे नाव - विलास दिलीप कुरडकर वय 24 वर्ष रा. पवनी
तसेच सदर नाकेबंदी दरम्यान एक मोटार सायकल ची झडती घेतली असता मोटार सायकलवर दोन आरोपी सह त्यांच्या ताब्यात
 १) 180 ml चे 54 नग 
किंमत 9600/- रू.
२)मोटार सायकल क्र. MH 36 A 1921
किंमत रु. 30,000/-
एकूण किं. 39,600 /-रू.
ताब्यात घेऊन जप्त केले व गुन्हा नोंद केला.
आरोपी- 
१. नरेश कवळे वय 30 वर्ष
२. महेश शेंडे वय 19 वर्ष

तसेच मौजा काहाली येथे आरोपी सचिन धनविजय वय 30 वर्ष याचे घर झडतीत देशी दारू 40 नग किंमत रु. 4,000 /- मिळून आली त्याचेवर गुन्हा नोंद केला. आजचे एकूण कारवाईत  4आरोपी विरूद्ध गुन्हे नोंद करून एकूण 4,43,600 /-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.