भरारी पथकाचा मास्क न वापरणाऱ्यांना दणका : कोरपना तालुक्यात दोन दिवसात ५२ जणांवर कारवाई #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरारी पथकाचा मास्क न वापरणाऱ्यांना दणका : कोरपना तालुक्यात दोन दिवसात ५२ जणांवर कारवाई #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना: 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरपना पंचायत समिती प्रशासनाने तीन भरारी पथकांची नियुक्ती केली. या अनुषंगाने तालुक्यातील गावोगावी ही भरारी पथके फिरत असून मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात कोरपना तालुक्यात या भरारी पथकाने बावन्न जणांवर ही कारवाई केली आहे. 

यामध्ये बुधवारला नांदा दोन, उपरवाही -आठ,थूटरा- सात रूपापेठ -दोन व गुरुवारी  वनसडी -सोळा, नारंडा -दोन , अंतरगाव -सहा , कुकडसाथ -दोन जणावर कारवाई करण्यात आली. 

सदर कारवाई कोरपणाचे सर्वग विकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सर्वंग विकास अधिकारी दिलीप बैलनवार, गटशिक्षणाधिकारी आनंद धूर्वे , कृषी अधिकारी विवेक दुधे , बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांच्या नेतृत्वातील पथकांनी केली. प्रत्येक ग्रामपंचायतीने सामान्य फंडातून नागरिकांना मास्कचे वितरण केले आहे. 

त्याचप्रमाणे प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात मास्क लावण्याविषयी जनजागृती केली. तरी देखील अनेक लोक विना मास्क फिरताना दिसतात. नागरिकांनी आरोग्यविषयक दक्षता बाळगून मास्क वापरण्याचे आव्हान पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.