ग्रामपंचायत जवराबोडी मेंठा च्या वतिने गावकर्यांची मोफत आरोग्य तपासनी : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्या करीता मोफत होमियोपैथिक औषधाचे वाटप #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामपंचायत जवराबोडी मेंठा च्या वतिने गावकर्यांची मोफत आरोग्य तपासनी : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्या करीता मोफत होमियोपैथिक औषधाचे वाटप #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

तालुक्यातील मौजा जवराबोडी मेंठा येथे ग्रामपंचायतीच्या वतिने १४ वा वित्त आयोगा अंतर्गत सध्या जगात देशात कोरोना रोगाचे थैमान माजलेले आहे,या रोगाची लागण झपाटयाने होत असल्यामुळे लक्षात येता,ग्रामपंचायतीने गावकर्यांच्या हीता करीता सर्व गावकर्यांची आरोग्य तपासणी करुन लोकाना मोफत होमियोपैथिक औषधाचे वाटप करण्यात आले.

त्या करीता डॉ.बनवाडे साहेब होमीओपॅथीक ब्रम्हपुरी यांना बोलविण्यात आले,डॉ.बनवाडे यांचे सर्व आरोग्य तपासनी करणारे यंत्र व आपल्या दवाखान्याची सर्व टिम घेउन आले होते,त्या वेळेस लोकांची योग्य तपासनी करुन विविध रोगावर व लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता औषधी देण्यात आले.

आरोग्य तपासनी सकाळी ९.००ते६.००वाजे पर्यंत चालली त्या वेळेस खासकरुन ग्रामपंचायतीने सोशल डिस्टंगसीग पाळण्यावर भरदिली.
 
या पुर्वी या ग्रामपंचायतीने गावातील सर्व लोकांना मास्क,साबुन,सानिटायझर,हॅंडवॉश व इतर साहीत्य संम्पुर्ण गावामध्ये वाटण्यात आले होते,मोफत आरोग्य तपासनी व औषध वाटपाचे वेळेस या क्षेत्राचे जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी भेट दिली या वेळेस ग्रामपंचायतीचे सरपंच,मा.अविनाश शेंडे,मां.चरणजी थेरकर, वनिता उईके शालीनी थेरकर, ,शमा नान्होरीकर ग्रामसेविकाजवराबोडी मेंठा, युवराज श्रिरामे,संजय थेरकर,सचिन नंन्नावरे,यांचे उपस्थितीत मोफत आरोग्य तपासनी व औषद वाटप करण्यात आले.