#covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

#covid-19

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : मारेगाव - 

स्थानिक कोविड केंद्रामध्ये असलेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णाने पहाटेच्या वेळेस पळ काढल्याने तालुक्यात एकच खळबळ उडालेली असुन रुग्ण पॉझिटीव्ह असल्याने भीतीसुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील पहिला पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या कुंभा येथील व्यक्तीला स्थानिक कोविड सेंटरला (पुरके आश्रम शाळेमध्ये) कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याच्यासोबत इतर ३६ व्यक्तीही येथे कॉरंटाईन करण्यात आले. पहाटे चार साडेचार वाजे दरम्यान वॉशरूमला गेला आणि तेथूनच रुग्ण पसार
झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पसार झाल्याचे वृत्त कळताच तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे .माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, पो.उपनिरीक्षक, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. आणि रुग्णाची शोधाशोध सुरू केली. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत पॉझिटीव्ह रुग्णाचा
कोणताही पत्ता लागलेला नसुन सर्वत्र शोधाशोध सुरु आहे.