विलगीकरण केंद्रातून पळून गेल्याने इसमावर गुन्हा दाखल :राजुरा शहरातील घटना #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विलगीकरण केंद्रातून पळून गेल्याने इसमावर गुन्हा दाखल :राजुरा शहरातील घटना #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत राजुरा शहरातील शिवाजी वॉर्ड येथील म्हाडा कॉलनी परिसरातील आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे.

सदर केंद्रातील व्यक्ती नामे सचिन ठाकूर वय 38 वर्ष राहणार पेठ वॉर्ड पाझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दिनांक. 27 / 07 / 2020 रोजी विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते.

परवा दिनांक 28 जुलै ला  ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे स्वाब नमुना  देऊन दुपारी 2.30 च्या परत आणले असता सदर व्यक्ती दारू पिऊन असल्याचे निदर्शनास आले व त्याने गोंधळ घालणे सुरू केले. 

तसेच दुपारी4.30 वाजता पळून गेला त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम कलम 51 व साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897चे कलम 3 व भारतीय संहिता १८६०चे कलम 188 269, 270, 271 नुसार नोडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवाणे यांचे तक्रारीनुसार मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांचे द्वारे राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. राजुरा पोलीस स्टेशन ठाणेदार चे मार्गदर्शन काली पुढील तपास सुरु आहे.