चंद्रपूर जिल्ह्यात नववधू निघाली पॉसिटीव्ह :आज मुल तालुक्यात तीन बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात नववधू निघाली पॉसिटीव्ह :आज मुल तालुक्यात तीन बाधित #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -


मूल तालुक्यातील जानाळा येथे 2 कोरोना पाझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे.दोन दिवसापूर्वी जाणाळा येथे लग्न समारंभ झालं होतं. या लग्न सोहळ्यात ऊर्जानगर येथील एक महिला सहभागी झाली होती. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, आरोग्य यंत्रणेने या लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांचे स्वॅब नमुने घेतले होते. 

यापैकी वधु आणि तिच्यासोबतची एक महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज प्रशासनाने जाणाळा येथे जाऊन या पॉझिटिव महिलांच्या संपर्कात झालेल्यांचे स्वॅब घेणे सुरू केले.

बेंबाळ येथील एक युवक देखील कोरोना पॉझिटिव निघाल्याने आज मूल तालुक्यात कोरोना चे रुग्ण संख्या तीन झाली आहे.