अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण :स्वतः ट्विट करून दिली माहिती #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण :स्वतः ट्विट करून दिली माहिती #covid-19

Share This
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी, असेही बिग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.