वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची ब्रम्हपुरी तालुक्यात पाहणी #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची ब्रम्हपुरी तालुक्यात पाहणी #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
    
ब्रम्हपुरीत कोरोनाचा प्रसार सतत दोन दिवस वाढला दिनांक २८ व२९ ला रुग्ण वाढत गेले त्यामुळे ब्रम्हपुरीमध्ये दिनांक १ जुलै ते३ जुलै पर्यंत ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांचे मागणीवरून जिल्हाधिकारी यांनी परवानगी देवुन अभुतपुर्व कडकडीत लाकडाऊंन पाळण्यात येत आहे त्याकरिता सर्व नागरिकांनी सुद्धा प्रशासनास सहकार्य करीत आहे. 

रुग्ण मिळालेला परिसर सिल करुन कंटेनमेंट दोन घोषित केला .रुग्णाच्या संपर्कात येणारे त्याच्या घरचे व संबंधीत यांना क्वारंटाईन करुन स्कॅब घेण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ब्रम्हपुरीमध्ये अचानक भेट देवुन सिल केलेल्या परिसरातील पाहणी केली व कोरोना संबंधित आढावा घेतला सोबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्य अधिकारी मंगेश वासेकर.ऊपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे व इतर होते.

परंतु सतत दिवस दोन १ व २ जूलैला आलेले सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आलेत त्यामुळे सध्याच्या काळात ब्रम्हपुरीमध्ये जे भितीचे वातावरण होते ते काही प्रमाणात दुर झाले व लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.