चिमूर कॉटन इंडस्ट्रीज येथिल कामगार महिलेचा हात तुटला : जिनींग मध्ये कामगारांना कोणतेही सुरक्षा कवच नाही : कामगारानां अपघात विमा नाही : जिनिंग मध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर #cotton-industry-ginning-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर कॉटन इंडस्ट्रीज येथिल कामगार महिलेचा हात तुटला : जिनींग मध्ये कामगारांना कोणतेही सुरक्षा कवच नाही : कामगारानां अपघात विमा नाही : जिनिंग मध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर #cotton-industry-ginning-accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -

चिमूर कॉटन इंडस्ट्रीज येथिल कामगार महिला मीरा राजू सहारे वय अंदाजे ३५ वर्षे रा.चिमूर यांचा काम करीत असतांना मशीनमध्ये चुकुन हात गेल्याने उजवा हात अपघातग्रस्त होऊन  तुटून मशीनमध्ये पडल्याने त्या महिलेला उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले. 

कामगार महिला हि गंभीर जखमी अवस्थेत असल्याने जिवितास धोका होऊ नये म्हणून पुढील उपचारास नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.हि घटना काल दिनांक 3 जुलै  सायंकाळी 5 : 30 वाजताच्या दरम्यान घडली असून अनेक दिवसांपासून हि महिला चिमूर कॉटन इंडस्ट्रीज मध्ये कामगार पदावर कार्यरत आहे.

हि महिला सुरक्षा कवच (युनिफॉर्म) विना काम करीत असतांना हा प्रकार घडला.या महिलेचा विमा चिमूर कॉटन इंडस्ट्रीज च्या मालकांनी काढलेला नसल्याचे निदर्शनास आले असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

चिमूर तालुक्यात 3 कापूस जिनिंग आहे. महिलेच्या अपघाताची घटना सुरक्षा कवच नसल्यामुळे घडली.  याच प्रकारची आक्षेपार्ह कामे तर बाकी जिनिंग मध्ये नाही ना ?