चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू दर शून्य : ठरला राज्यातील एकमेव जिल्हा #corona-mortality-rate-is-zero-at-चंद्रपूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू दर शून्य : ठरला राज्यातील एकमेव जिल्हा #corona-mortality-rate-is-zero-at-चंद्रपूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहराचा व जिल्ह्यात बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा सरासरी दर 17 दिवसांचा होता. गेल्या काही दिवसात मात्र, तो 12 दिवसांवर आल्याने ही धोक्याची घंटा समजून महानगरात 10 दिवसाची कडक टाळेबंदी जारी करण्यात आली. 

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 276 असून, सक्रिय संख्या 117 असली, तरी चंद्रपूर जिल्हात कोरोनामुळे एकही मृत्यूमुखी पडलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हाच एकमेव जिल्हा आहे, ज्या ठिकाणी शून्य मृत्यूदर आहे.

स्थिती सामान्य व्हावी म्हणून, या टाळेबंदीच्या दहा दिवसात उपचार, तपासणी आणि अलगीकरण या सूत्रांवर भर दिला जाणार आहे. टाळेबंदीला नागरिकांनी सलग  तीनही दिवस (17, 18, 19 जुलै )चांगला प्रतिसाद दिला. शनिवारीही महानगरातील रस्ते ओस पडले होते. टाळेबंदीत निष्काळजीपणा करणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.