विद्युत शॉक ने शेतकऱ्यांचा मृत्यू#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्युत शॉक ने शेतकऱ्यांचा मृत्यू#chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :- 

ब्रम्हपुरी येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोधी (गांगल वाडी ) येथील शेतकरी नितीन मारबते वय 40 हा शेतावर पंपाने पाणी देण्यासाठी सकाळी 7 वाजता घरालगतच्या शेतात गेला. पण विद्युत पंप सुरु करायला गेला असता विद्युत पंप हा शॉट असल्याने त्याला विद्युत करंट चा जबर झटका बसला शेतामध्ये कोणीही नसल्यामुळे तो तिथेच मृत्यू  मुखी पडला. 

शेतावर जाताना घरा शेजारच्या एका महिलेला  पाणी करण्यासाठी चाललो म्हणून सांगुन शेताकडे गेला परंतु तिने शेताकडे बघितले तर निखिल  हा शेतामध्ये दिसला नाही त्यामुळे ती शेताकडे गेली असता तिला निखील हा मृता अवस्थेत पंपाला हात धरून आढळला. 

त्याची माहिती त्याच्या घरच्यांना व गावकर्यांना दिली लगेच घटनेची माहिती मेंडकी पोलीस चौकी येथे देण्यात आली घटना स्थळी मेंडकी येथील पोलीस दाखल होवून पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास मेंडकी पोलीस मोरेश्वर देशमुख करीत आहेत. अचानक कर्ता व्यक्तीचा  मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

 निखिलच्या परिवारामध्ये पत्नी व २ मुले असा परिवार आहे तरी गावामध्ये निखिलच्या मृत्यू ने शोककळा पसरली आहे.