माझ्यावर लावलेले आरोप राजकारणाने प्रेरित व बिनबुडाचे - सतीश भिवंगडे #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माझ्यावर लावलेले आरोप राजकारणाने प्रेरित व बिनबुडाचे - सतीश भिवंगडे #chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

आज दिनांक 13 जुलै 2020 ला सायंकाळी 4.30 वाजता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवंगडे यांनी स्थानिक प्रेस क्लब मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर नितीन अलोने द्वारा लावलेल्या आरोपाचे खंडन करून हे आरोप राजकीय सूडबुद्धीने नितीन ला मोहरा बनवून राजकीय  घटनेला प्रेरित होऊन करण्यात आले आहे असे वक्तव्य केले.

काल दि. 12 जुलै ला नीतीन अलोने यांनी पत्रकार परिषद घेऊन सतीश भिवंगडे वर 2018 चे दांडिया चे 1.40 लाख न दिल्याचे आणि पैसे मागितल्यावर मारण्याची धमकी देण्याचे खोटे आरोप लावले होते. परंतु सत्य असे आहे की नितीन अलोने ला 90 हजारात काम देण्यात आला होता परंतु निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे त्याचे 20 हजार कापून त्याला 70 हजार देण्यात आले होते ज्या साठी नितीन त्यावेळी तय्यार झाला होता. परंतु सतीश भिवंगडे राजकारणात सक्रिय असल्यामुळे काही राजकीय नेता व स्वतः त्यांच्याच पार्टी शिवसेना चे काही पदाधिकारी त्यांना आपला शत्रू मानतात जेणेकरून भिवंगडेला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आला.

माझी मागील वर्षभरात नितीन शी भेटच झाली नाही तर धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.पत्रकार परिषेदेत मागील वर्षी दांडियाचा काम करणारे घटे डेकोरेशन चे राजू घटे सुद्धा उपस्थित होते. उल्लेखनीय आहे की राजू घटे हे चंद्रपूरचे सर्वात उत्कृष्ट व महागातले एक डेकोरेशन वाले आहे ते स्वतःहून उपस्थित होऊन आवर्जून हे सांगितले की मला मागील वर्षी दांडिया च्या काम करण्यासाठी ठरल्या प्रमाणे पूर्ण पैसे मिळाले व कुठलाच त्रास झाला नाही.

2019 मध्ये राजू घटे चे कामाचा बिल फक्त 1.40 लाख झाला होता तर 2018 मध्ये नितीन अलोने चा बिल 2.40 लाख कस होऊ शकते हे विचारनिय आहे.

नितीन ने पुरावा दिल्यास मी पैसे द्याला तय्यार आहे अन्यथा नितीन अलोने नी खोटे आरोप लावल्यामुळे जाहीर माफी मागावी व या मागे कोणाचे हाथ आहे सांगावे अन्यथा मी त्याच्या विरोधात मानहानी चा दावा करणार असे सतीश भिवंगडे यांनी सांगितले.