शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांची मुजोरी : दांडिया उत्सव मंडप डेकोरेशन चे पैसे मागितल्याने शिवीगाळ : मंडप डेकोरेशन मालकाने दाखल केली तक्रार : दिली पत्रकार परिषदेत माहिती #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांची मुजोरी : दांडिया उत्सव मंडप डेकोरेशन चे पैसे मागितल्याने शिवीगाळ : मंडप डेकोरेशन मालकाने दाखल केली तक्रार : दिली पत्रकार परिषदेत माहिती #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 


शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांनी शहरातील सिंधी पंचायत मैदानावर मागील अनेक वर्षांपासून शिवसेना दांडिया उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले. या उत्सवात लाखो रुपये खर्च करून स्पर्धकांना विविध पारितोषिके सुद्धा दिली. वर्ष 2018ला सुद्धा या दांडियाच आयोजन मोठ्या थाटात करण्यात आलं मात्र या उत्सवाच्या  मंडप, डेकोरेशन व साउंड सर्व्हिसेस चे गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी लाखोंचे बिल न देता बिल मागण्यासाठी गेलेल्या डेकोरेशन मालकाला शिवीगाळ केल्याची पोलीस तक्रार दिली असल्याची माहिती नितीन अलोने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

सदर मंडप डेकोरेशन चे काम नितीन अलोने या युवकाला देण्यात आलं होतं.त्या कामाचे एकूण बिल 2 लाख 10 हजार रुपये झाले होते, माजी जिल्हाप्रमुखांनी अलोने याला 70 हजार आधीच एडवांस स्वरूपात दिले असल्याने पुढचे पैसे मिळणार यासाठी 10 दिवस त्या उत्सवात आपली सेवा पुरविली.

परंतु आज जवळपास त्या कार्यक्रमाला दीड वर्षे लोटले असताना अजूनही अलोने यांना उर्वरित रक्कम तब्बल 1 लाख 40 हजार मिळाले नसल्याने त्यांच्या घरची परिस्थिती बिघडली व त्या कारणाने नितीन अलोने यांनी सतीश भिवगडे यांना वारंवार पैश्याची मागणी केली परंतु आज देतो उद्या देतो असे म्हणत पैसे दिले नसल्याची माहिती अलोने यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

यावर्षी जगात व देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्याने सर्व क्षेत्रातील कामे ठप्प पडली आहे.यामुळे अलोने हे सतीश भिवगडे यांना 11 जुलैला भेटून घरची परिस्थिती काय त्याबद्दल कल्पना देत पैसे देण्याची मागणी केली असता नितीनला अश्लील शब्दात शिवीगाळ करून धक्कामुक्की करण्याचा प्रकार केला असा आरोप अलोने यांनी भिवगडे यांचेवर केला आहे.

घडलेल्या प्रकारची मी पोलीस तक्रार केली आहे मला माझ्या मेहनतीचे पैसे देण्यात यावे अशी मागणी अलोने यांनी यावेळी केली आहे.