सुनांनी दिला सासऱ्याच्या पार्थिवाला खांदा #राजुरा येथील पोटे परिवारातील कर्तव्यदक्ष सुनांनी पाडला नवा सामाजिक पायंडा !#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुनांनी दिला सासऱ्याच्या पार्थिवाला खांदा #राजुरा येथील पोटे परिवारातील कर्तव्यदक्ष सुनांनी पाडला नवा सामाजिक पायंडा !#chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -

मुलींनी आपल्या वडिलाला अंत्ययात्रेत खांदा दिल्याचे ऐकले असेल. पण, राजुर्‍यात मुलांसोबत सुनांनीही आपल्या सासर्‍याच्या पार्थिवाला खांदा देण्याचे उदाहरण पोटे कुटुंबात बघायला मिळाले. 

राजुरा शहरातील देशपांडे वाडी येथील रहिवासी प्रतिष्ठित नागरिक श्यामसुंदर उरकुडाजी पोटे (95) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (3 जुलै ) पहाटेच्या सुमारास निधन झाले.

बल्लारपूर येथील वेकोलिचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक पुरुषोत्तम पोटे यांचे ते वडील होते. पोटे यांच्या मृत्यू पश्च्यात सहा मुले, सुना, नातवंड असा आप्तपरिवार आहे. 

त्यांच्या अंत्ययात्रेसाठी परिवारातील मर्यादित नागरिक उपस्थित होते. अंत्ययात्रेदरम्यान पोटे यांच्या सुना सिंधू व शारदा पोटे यांनी आपल्या सासर्‍याच्या पार्थिवाला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.