आत्महत्येसाठी गेलेल्या युवतीला वाचविले #chandrapur-police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आत्महत्येसाठी गेलेल्या युवतीला वाचविले #chandrapur-police

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

दुर्गापूर येथील एक २५ वर्षीय युवती आत्महत्या करण्यासाठी घरून निघून गेली. तिने मोबाईलवरून घरी तसा संदेशही पाठविला. याची तक्रार कुटुंबीयांनी दुर्गापूर ठाण्यात केली.

दुर्गापूर पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत युवतीचे लोकेशन घेत तिला आत्महत्येपासून परावृत्त करीत कुटुबीयांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रक्रियेत दुर्गापूर ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव खोब्रागडे, पोलीस नायक अफसर खान पठाण, सायबर सेलचे पोलीस नाईक मनावर अली, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई छगन जांभुळे यांनी अतिशय धडपडीने आपले कर्तव्य पार पाडले.

त्यामुळे सदर युवतीचे लोकेशन सापडून ती वीज केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रातील रेल्वे रुळाजवळ असल्याचे कळले. तिथून तिची समजूत काढून तिला घरी आणले.