जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबे यांची शरणागती #Cdcc Bank-Chairman-Paunkar-and-CEO-Dubey-सरेंडर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबे यांची शरणागती #Cdcc Bank-Chairman-Paunkar-and-CEO-Dubey-सरेंडर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

गत पंधरवाड्यापासून भूमिगत असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दार्थ नामदेव दुबे यांनी सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 24 कर्मचार्‍यांना शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र जोडून 24 पाल्यांना अनुकंपा तत्वावर बँकेच्या सेवेत सामावून घेतले. या प्रकरणाची तक्रार बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, संतोष रावत व माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनी केली होती.

दरम्यान, संचालक संदिप गड्डमवार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल करताच अध्यक्ष व सीईओ विरूध्द गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून अध्यक्ष व सीईओ दोघेही फरार होते. या दरम्यान दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता.दोन्ही न्यायालयाने जामिन फेटाल्यानंतरही अध्यक्ष व सीईओ फरार होते. सोमवारी दुपारी मात्र, पाऊणकर व दुबे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मकेश्वर यांच्यासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक मकेश्वर यांना विचारणा केली असता, पाऊणकर व दुबे यांनी शरणागती पत्करली, त्यानंतर त्यांना अटक केली आहे. मंगळवार, 28 जुलै रोजी त्यांना जिल्हा न्यायालयात सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.