पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संप्तप नागरिकांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलुप #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संप्तप नागरिकांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलुप #bramhpuri

Share This

:- खेड ग्रामपंचायत येथील लोकप्रतिनिधी बद्दल नागरिकांत उदासीनता.....
:- दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते पायपीट...
:- खेड येथील सरपंच यांनी केली ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार...


खबरकट्टा / चंद्रपूर ::ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी तालुक्यातील अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या खेड येथे दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.अनेक सुचनाही ग्रामपंचायतीला करण्यात आले.पण संबंधित प्रशासन या पुर्णपणे दुर्लक्ष करून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.या समस्या मुळे खेड गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत.मारोती मेत्राम यांनी व गावातील नागरिकांनी अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार दिली.ग्रामपंचायत यांनी तुट- फुटीचे कारण पुढे करून काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत.तरी ग्रामपंचायत प्रशासन बघायची भुमिका घेऊन बघत आहेत.विशेष म्हनजे या गावातील जिल्हा परिषद सदस्य असलेल्याने ग्रामपंचायतीला कुलुप ठोकलेल्या प्रकारची चर्चा होत आहे.गावकऱ्याना ग्रामविकास अधिकारी यांना विचारले असता तुम्ही मला तुम्ही काही विचारू नका आपले सदस्यांना सांगा असे उत्तर एका जबाबदार अधिकारी यांच्या कडून मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीला कुलुप ठोकले.गावकरी जायचे तर कोणाकडे जायचे असा प्रश्न गावातील नागरिकांना पडत आहे.

अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार केली पण कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.ही समस्या दोन वर्षांपासून सुरू आहे.पिण्याच्या पाण्यासाठी कामं सोडून पायापीठ करावी लागत आहे.सचिव यांनी सुध्दा ही जबाबदारी माझी नाही म्हटलं तर मग काय करायचं मग सोसल डिस्टन ठेवून ग्रामपंचायतीला कुलुप लावुन निषेध व्यक्त करण्यात आले.