ब्रह्मपुरी पंचायत समिती येथील शिक्षणाधिकारी यांच्या विभागाचे छत कोसळले #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरी पंचायत समिती येथील शिक्षणाधिकारी यांच्या विभागाचे छत कोसळले #bramhpuri

Share This

⭕ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष....
⭕ अचानक छत कोसळल्याने वस्तुची तुटफुट....
⭕ गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी थोडक्यात बचावले.....
⭕ जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांची शिक्षण विभागाला भेट

खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी पंचायत समिती येथील शिक्षण विभागाची इमारत हि खुप जुन्या काळातील असुन या इमारतीत अनेक वर्षांपासून जीव धोक्यात घालून अधिकारी काम करत आहेत.या इमारती ला तीन वर्षे आगोदर निरलेखित केले आहे.अनेकदा पंचायत समिती व शिक्षण विभागा कडुन नवीन इमारतीचे प्रस्ताव पाठविण्यात आले.पण अद्यापही या नवीन इमारतीला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.शिक्षण विभाग अनेक वर्षांपासून जुन्या इमारत मध्ये कार्यरत आहे.

या विभागांमध्ये ग्रामिण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येत असतात.व अनेक शिक्षक सुध्दा इंथ बसुन आपले काम करत असतात.गटशिक्षधिकारी यांच्या विभागाचे छत कोसळल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.काल सायंकाळी चार वाजता सुमारास गटशिक्षणाधिकारी हे कामानिमित्त बाहेर गेले व चपराशी बाहेर बसले असताना अचानक छत कोसळल्याने सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

गटशिक्षणधिकारी नेहमीच या विभागात कार्यरत असतात.काल पण ते तीथेच बसले पण एक मन आहे देव तारी त्याला कोण मारी असे गटशिक्षणाधिकारी यांच्या सोबत घडले.कोणतेही कर्मचारी त्यावेळेस नसल्याने मोठी हाणी टळली.पंचायत समिती येथील शिक्षण विभागात अनेक शाळांचा कारभार आहे.अनेक नागरिक आपल्या अडचणी घेऊन शिक्षणाधिकारी यांच्या कडे संबंधित कामानिमित्त येत असतात. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी छत कोसळल्याने विभागाची पाहणी केली.

ही इमारत पुर्णपणे जिर्णं झाली आहे.तीन वर्षे आगोदर निरलेखित पण  इमारत झाली आहे.पण अद्यापही या नवीन इमारतीला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.अनेक वर्षे झाली जुन्या इमारत मध्ये शिक्षण विभाग कार्यरत आहे. कोसळले छताची दुरुस्ती केल्यानंतर शिक्षण विभाग तीथेच सुरू राहणार.व आमच्या कडे शिक्षण विभाग साठी योग्य इमारत नाही.प्रणाली खोचरे गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी

अनेकदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठविण्यात पण अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.बर झाले आज मी बाहेर गेले असता ही घटना घडली.व‌ कर्मचारी सूध्दा नसल्याने खूप मोठा अनर्थ टळला.आज पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.प्रमोद नाट शिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी

 • पंचायत समिती येथील शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयांचा छत कोसळल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तरी मी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मिटिंगमध्ये या विषयावर चर्चा करणार आहे. यांचा पाठपुरावा करून लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले जाईल.प्रमोद चिमुरकर (जिल्हा परिषद सदस्य)