शस्त्रक्रिया झालेला युवक पोहोच ला जोधपुरहून स्वगावी #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शस्त्रक्रिया झालेला युवक पोहोच ला जोधपुरहून स्वगावी #bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

ब्रह्मपुरी:  बेरोजगारीमुळे राजस्थान येथे कंपनीत काम करण्यासाठी गेलेल्या मूळच्या रुई येथील तरुणाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर मित्रांनी वेळीच रुग्णालयात उपचार केल्याने मित्रांनी मित्राला जीवन दान दिले होते. आजारी मुलाला गावाकडे पोचविण्यासाठी मुलांनी आर्त हाक दिली होती अखेर ती मुलं पारोमिता गोस्वामी यांच्या प्रयत्नाने सुखरूप स्वगावी पोचले आहेत
               
ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथील नवनाथ प्रभाकर राऊत हा एकवीस वर्षीय तरुण घरची परिस्थिती बेताची असल्याने कामाच्या शोधात मित्रांसोबत राजस्थान येथील जोधपूर येथे कंपनीत काम करण्यासाठी गेला होता. कंपनीत काम व्यवस्थित सुरू असतानाच अचानक पोटात दुखायला लागल्याने प्राथमिक उपचार तेथील रुग्णालयात केले.  मात्र,  पुन्हा दोन दिवसात पोट दुःखण्याच्या वेदना तीव्र होत असल्याने मित्रांनी जोधपूर येथील यश अमन हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. येथील डॉक्टरांनी नवनाथला तपासल्यानंतर पोटातील आतडी फाटली असल्यामुळे एका तासात त्याच्यावर उपचार होणे आवश्यक होते. 

त्यासाठी सुमारे चाळीस पन्नास हजार रुपये  मित्रांनी गोळा करुन  नवनाथची शस्त्रक्रिया वेळीच करून घेतली. एक आदर्श समाजासमोर निर्माण केला.  मित्रांच्या सतर्कतेमुळे  नवनाथला जीवनदान मिळाले.  नवनाथचे  मित्र ताराचंद मांढरे, मयूर ढोरे व इतर मित्र  हे त्याची काळजी घेत होते. नवनाथला गावाकडे आणण्यासाठी मित्रांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता.तर लॉकडाउन सुरू असल्याने परत कसे आणावे असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची माहिती पत्रकार विनोद चौधरी यांनी   पारोमिता गोस्वामी यांना दिली असता पारोमिता गोस्वामी यांनी जोधपुर  येथील डॉक्टरशी संवाद साधून तब्येतीची विचारपूस केली व नवनाथला गावाकडे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होत्या. 

नवनाथला गावाकडे आणण्याकरिता जवळपास येणे-जाणे अठराशे किलोमीटरचा प्रवास असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक  मदतीची गरज होती. स्थानिक लोकप्रतिनिधीची मदत मिळू शकेल काय असा प्रश्न जनसामान्यांत उपस्थित होत  होता अखेर आम आदमी पार्टीच्या राज्य समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी सातत्याने प्रयत्न चालू ठेवून आर्थिक खर्च उचलत नवनाथला त्याच्या मूळ गावी रुई येथे आणण्याची सोय केली. नवनाथ सोबत त्याचे रुई येथील एक , निलज येथील एक व गडचिरोली जिल्ह्यातील पिसेवडधा येथील दोन मुले स्वगावी परतले.
        
नवनाथ सध्या होम कोरंटाईन मध्ये आहे. परिस्थिती हालाखीची असल्याने झोपडीवजा घरात पुढील उपचार शक्य नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्याला योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.