कामगार नेते विनोद झोडगे यांची तुरुंगा मधुन सुटका :- सुटका होताच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष#bramhapuri. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कामगार नेते विनोद झोडगे यांची तुरुंगा मधुन सुटका :- सुटका होताच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष#bramhapuri.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 

कष्टकरी, शेतकरी, कामगार,आशावर्कर यांच्या साठी सदैव झटत असणारे विनोद झोडगे हे सामान्य माणसाच्या मदतीला ध्वज निधी च्या नावावर बेकायदेशीर पणे लग्नाच्या परवानगी साठी पाचशे घेत असल्याच्या तक्रारीवरून जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता त्यांच्या वर खोटे आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आले.कामगार नेते विनोद झोडगे हे नेहमीच एक संघर्ष करणारे नेते म्हणून तालुक्यांत ओळख आहे.

जनतेच्या न्यायासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. १२ जुन ला त्यांना अटक करून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांना अथक परिश्रमाने १ जुलै ला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. विनोद झोडगे यांची तुरुंगातुन सुटका होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.कामगार नेते विनोद झोडगे यांनी जनतेच्या हितासाठी तुरूंगात जावे लागले.ही बाब अभिनंदनीय आहे.सुटका होताच ब्रह्मपुरी तालुक्यात जल्लोष केला जात आहे.

आमची न्यायाची लढाई नेहमीच सुरू राहणार आहे.तुरूगांत जावे लागले तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही.मी कष्टकरी, शेतकरी, कामगार, आशाताईसाठी व सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी झटणारे आहोत.ही लढाई नेहमीच सुरू राहणार.विनोद झोडगे - कामगार नेते ब्रह्मपुरी