श्री. राहुल पावडे यांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन : यंदाचे वर्ष सेवावर्ष : रक्तदान महानकार्य :#blood donation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री. राहुल पावडे यांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन : यंदाचे वर्ष सेवावर्ष : रक्तदान महानकार्य :#blood donation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

यंदा कोरोनाच्या संकटाने अवघे मानवी जीवन विस्कळीत झाले आहेे. अशावेळी सर्वसामान्यांना आधार देणे ही काळाची गरज आहे. नव्हे, ईश्वरीय कार्यच आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा भर राजकारणाशिवाय समाजकारणावर जास्त असतो आणि म्हणूनच येत्या 30 जुलैला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यंदाचे वर्ष सेवा वर्ष म्हणून राबविण्याचे ठरवले आहे. 30 जुलै 2020 ते 30 जुलै 2021 पर्यंत भाजपा सेवाकार्य सुरू राहणार आहे. 

याच अनुषंगाने  चंद्रपूर मनपा उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती,चंद्रपूर शहरातील भाजपचे सक्रिय व युवकांचे मार्गदर्शक श्री. राहुल पावडे यांच्या मित्रावरीवाराच्या वतीने आज दिनांक 30 जुलै सन्मानीय सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री, वित्त, नियोजन व वने (महाराष्ट्र राज्य) तथा पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांच्या वाढदिवसानिमीत्य दिर्घायूची प्रार्थना रुग्णसेवेचे व्रत घेत रक्तदान शिबीर आयोजिले असून शहरातील नागरिकांना रक्तदान करत सेवाव्रत पूर्ण करण्याचे आवाहन श्री. पावडे यांनी केले आहे. 


⭕️ रक्तदान शिबीर स्थळ  : मातोश्री लॉन, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर

⭕️ दिनांक :30 जुलै 2020, वेळ : सकाळी 9:00पासुन