माजी सभापती भाजपाच्या वाटेवर ? नागरिकांत चर्चेला ऊत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी सभापती भाजपाच्या वाटेवर ? नागरिकांत चर्चेला ऊत

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :  घुग्घुस प्रतिनिधी -

राजकीय जीवनात खांद्याला खांदा लावून गङ जिंकण्यासाठी रात्रंदिवस एक करणारे साथीदार पक्ष सोङून गेलेत. आता एकाकी पङलेल्या सेनापतीलाही करमेनासे झालेय. त्यामुळे ते भाजपच्या गोतावळ्यात दिसू लागले आहेत. यावरून माजी पंचायत समितीचे सभापती पचारे काॅग्रेस पक्षातून भाजपमध्ये जातील, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

मागील ग्रामपंचायतच्या पोट निवळणुकीत सौ. लक्ष्मी चिण्णाजी नलभोगा हे भाजप स्मरतीर्थ उमेदवार असतांना त्यांना बिनविरोध निवङून आणण्याकरिता तसेच त्यांना काँग्रेसचे समर्थन मिळवून देण्याकरिता खूप तळमळ केली होती.
पंचायत समितीच्या पोट निवङणुकीत काँग्रेस पक्षाविरोधात उघड बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे रोशन पचारे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

असे असतांना नुकतेच भाजप नेते व शिक्षक हेमंत उरकुडे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात नियमांचे उल्लंघन करून साजरा करण्यात आला.यामध्ये भाजप जिल्हाध्यक्षा पासून ते सर्वच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली मात्र या वाढदिवस पार्टीचे आकर्षण ठरले ते काँग्रेसचे नेते रोशन पचारे या कार्यक्रमाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित होताच रोशन पचारे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे घुग्घुस परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

भाजप नेत्यांच्या वाढदिवसाला हजेरी लाऊन पचारे हे  राजकीय संबंध वृद्धी करण्याचे अथवा व्यक्तीक संबंध सुदृढ करण्याचे प्रयत्न करीत आहे तेच जाणे.मात्र भाजप नेत्यांच्या वाढदिवसाला कोरोना महामारी मध्ये काँग्रेस नेत्यांची उपस्थितीमुळे परीसरात खमंग चर्चेला उत आला असून काही लोक याला राजस्थान प्रकरणाशी ही जोडत आहे.

कारण घुग्घुस ग्रामपंचायतच्या अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेस  सदस्यांना भाजपाने आपल्या पक्षात घेऊन घुग्घुस ग्रामपंचायतवर भाजपाने ताबा मिळविले आहे.
रोशन पचारे यांचे खंदे समर्थक असलेले प्रभारी सरपंच संतोष नूने, प्रकाश बोबडे ग्रामपंचायत सदस्य, बबलू सातपुते, दिलीप कांबळे, कुसुम सातपुते ग्रामपंचायत सदस्य, सौ. नंदा कांबळे ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण सोदारी हे या आधीच काँग्रेस सोडून भाजपात गेलेले आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.पुष्पा मेश्राम यांना निवङून आणण्यात पचारे यांचा सिंहाचा वाटा होता.मात्र या महिला सरपंचाला भाजपने काम करू दिले नाही .


त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावून काँग्रेसचेच उपसरपंच संतोष नूने यांना भाजपात घेऊन प्रभारी सरपंचपद दिले.देवराव भोंगळे यांच्यावरील 09 कोटी 51 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयात जनहित याचिका परत घेण्याचा बक्षिस स्वरूपात संतोष नूने यांना सरपंच पद मिळाले हे विशेष.