जाहीर सूचना चंद्रपूर : आझाद बगीच्या समोरील नाल्याचे बांधकाम सुरु झाल्याने नागरीकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना चंद्रपूर : आझाद बगीच्या समोरील नाल्याचे बांधकाम सुरु झाल्याने नागरीकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा

Share This
खबरकट्टा  / चंद्रपूर :  जाहीर सूचना - 

शहरातील मुख्य मार्ग असलेल्या महात्मा गांधी रोडवरील आझाद बगीच्या समोरील नाल्याचे बांधकाम सुरुअसल्याने वाहतुकदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- श्री टॉकीज- एकोरी वार्ड- अनुजा हॉटेल- झाडे हॉस्पीटल ते जयंत टॉकीज चौक या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केले आहे.

सदर बांधकाम 22 जुलै पर्यंत चालणार असल्याने या मार्गावरील वाहतुक वळती करण्यासंबंधी पोलीस विभागाला विनंती करण्यात आली होती त्यानुसार  वाहतुकीमुळे कुठल्याही प्रकारचा धोका, अडथळा किंवा गैरसोय होवु नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होवु नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडुन आझाद बगीच्याकडे येणारा रस्ता दि. 22/07/2020 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येत आहे. वाहतुकदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- श्री टॉकीज- एकोरी वार्ड- अनुजा हॉटेल- झाडे हॉस्पीटल ते जयंत टॉकीज चौक या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देश पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहे.  
  
शहराचा मुख्य रस्ता असलेल्या महात्मा गांधी रोडवर आझाद बगीचा आहे. या बगीच्यामधुन जाणारा नाला हा पुढे महात्मा गांधी रोड ओलांडुन समोर जातो. मात्र या आझाद बगीच्यासमोर रस्त्यावरील ब्रिज हा अतिशय जुना ( आर्च ) आहे. तो आता खचून नाला पुर्णपणे चोक झालेला असल्याने पाण्याला वाहून जायला जागा उरलेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे रस्ता क्रॉसींगमध्ये पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.