भारतीय जनता पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन विजबिल माफी, शेतकरी कर्जमाफी,पालकमंत्र्याद्वारे सरपंच नियुक्तीचा रद्द करणे, घरकुलाचे अनुदान या प्रमुख मागण्या नारंडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन #bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भारतीय जनता पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन विजबिल माफी, शेतकरी कर्जमाफी,पालकमंत्र्याद्वारे सरपंच नियुक्तीचा रद्द करणे, घरकुलाचे अनुदान या प्रमुख मागण्या नारंडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन #bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

भारतीय जनता पार्टीतर्फे चंद्रपुर जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
      
याच धर्तीवर जिल्ह्यातील नारंडा येथेसुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलन माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर,माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्यातर्फे करण्यात आले.
       
कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या तीन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्‍यामुळे गोरगरीब जनता संकटात सापडली आहे. कष्‍टकरी वर्ग, शेतकरी बांधव आदी घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मोठया प्रमाणावर विज बिले नागरिकांना प्राप्‍त झाली आहे. ते भरण्‍यास नागरीक पूर्णपणे असमर्थ आहेत. त्‍यामुळे सदर विज बिल माफ करण्‍यात यावे अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. तसेच एप्रिल 2020 पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्‍यात यावी
     
चंद्रपूर जिल्‍हयात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्‍त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्‍यांना न मिळाल्‍यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहे. तो निधी सुध्‍दा तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे,तसेच धनगर समाजाच्या घरकुल योजनेबाबतसुद्धा सरकार गंभीर नसून याबाबत तातळीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
    
विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच अनेक शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन सुध्‍दा झालेले नाही. त्‍यामुळे हंगामाच्‍या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतक-याला बाहेर काढण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच शेतक-यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे.
     
भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील  “ राजगृह “ या निवासस्थानावर भ्याड हल्ला करुन तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी. स्वत:ला पुरोगामी राज्याचे कर्तेधर्ते समजणाऱ्या राज्यकर्त्यांच्या या राज्यात अशी घटना होणे भुषणावह नसुन याची आम्ही तीव्र शब्दात निंदा करीत आहोत.
  
बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्‍य सरकारतर्फे पॅकेज देण्‍यात यावे अशी मागणी आम्‍ही सातत्‍याने करीत आहोत. मात्र राज्‍य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणा-यांसमोर उदरनिर्वाहाची समस्‍या निर्माण झाली. त्‍यामुळे गोरगरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
      
तसेच राज्यसरकारने पालकमंत्री यांच्या मार्फत सरपंच नियुक्तीचा अध्यादेश काढला आहे तोसुद्धा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
      
यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, उपसरपंच अनिल शेंडे माजी सरपंच खाडे पाटील,सत्यवान चामाटे, अनिल मालकेर, प्रवीण हेपट,अजय तिखट,मंगेश तिखट,आशिष निवलकर,स्वप्नील भोसकर व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.