वरोरा शहराच्या विकासकामात आले राजकारण! मुनगंटीवार यांना डावलल्याने भाजपाकडून निषेध तर जिवती येथे देवकतेंचि मैत्रीपूर्ण भूमिका #bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वरोरा शहराच्या विकासकामात आले राजकारण! मुनगंटीवार यांना डावलल्याने भाजपाकडून निषेध तर जिवती येथे देवकतेंचि मैत्रीपूर्ण भूमिका #bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
वरोरा  शहरात होत असलेली विकासकामे व सौंदर्यीकरणात राज्याचे माजी अर्थमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान मोठे आहे अर्थमंत्री व पालकमंत्री असताना शहरातील रस्ते, ई- लायब्ररी, नाल्या आदी विकासात्मक कामासाठी त्यांनी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. यामुळेच शहरात कधीही झाली नाही, एवढी विकासात्मक कार्य सुरु आहेत. 

मात्र, त्यांच्या कल्पनेतून व प्रयत्नांने मंजूर झालेल्या ई-लायब्ररीचे भूमिपूजन दबाव तंत्राचा वापर करून, त्यांच्या गैरहजेरीत करण्यात आल्याने भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते यांच्यात नाराजी असून, अशा प्रकारचे कृत्य करणार्‍यांना भाजपा सडेतोड उत्तर देईल, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.

वरोरा नगर परिषदेत माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व संजय देवतळे यांच्या प्रयत्नाने विदर्भातील पहिल्या नगर परिषदेवर अहेतेशाम अली यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा सत्तारूढ झाली. याच कालावधीत नगरपरिषदेच्या स्थापनेला 150 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना, शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरात विकासात्मक कामे होणे आवश्यक असल्याचे उद्देशाने अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मुनगंटीवार यांनी आतापर्यंत कधीच मिळाला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला व त्यातूनच शहरात विकासात्मक कार्य सुरु झाल्याने शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, गांधी उद्यान, नगरपरिषदेची नवीन इमारत, ले-आऊटमधील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण ही सर्व मुनगंटीवार यांची देण आहे. 

शहरात ई-लायब्ररी हीसुद्धा मुनगंटीवार यांची कल्पना असून, त्यासाठी प्रस्ताव करायला लावून विशेष प्रयत्न करुन ई-लायब्ररी मंजूर करून त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून दिला. मात्र नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गावर दबाव तंत्राचा वापर करून या ई-लायब्ररीचे भूमीपूजन करून घेतले. यावेळी मुनगंटीवार यांना डावलण्यात आले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांत रोष व असंतोष निर्माण झाला असून यापूर्वीसुध्दा असाच प्रकार घडल्याची कल्पना नगरवासियांना असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता येताच मुनगंटीवार यांनी, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा नगरवासियांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेला. शब्द पाळणारा व दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत हंसराज अहिर, संजय देवतळे हे प्रयत्नशील होते. 


मात्र, याच दरम्यान राज्यात सत्ता बदल झाल्याने ही योजना रखडली असली, तरी अजूनही ते प्रयत्नशील असून, विकासाच्या कामात राजकारण करुन भूमिपूजन करणे हे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी घटना आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्ष निषेध करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातसुद्धा याचधर्तीवर भूमिपूजन होत आहे, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या खनिज विकास निधी अंतर्गत जिवती तालुक्यात पांदण रस्त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला भाजपाचे जिवती पंचायत समितीचे उपसभापती यांची सुद्धा उपस्थिती होती,विद्यमान आमदारांकडून सुद्धा जुन्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे त्याला भजपच्याच  पदाधिकारी यांचा पाठिंबा आहे काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच होणार असून त्यामध्ये जिवती तालुका अध्यक्षकातीत महेश देवकते यांचे नाव आघाडीवर असून अश्यातच मागील काही निवडणुकीतील जिवती तालुका मताधिक्याच्या निकालाप्रमाणे आता उघडपणे दिसत असलेली काँग्रेस सोबत साधलेली देवकातेंची ही सलगी  पथ्यावर तर नाही पडणार अशी चिंता राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.