भरोसा सेल :महिला अत्याचार दोषींवर तात्काळ कारवाई करणे आता शक्य ! -भरोसा सेल व पोलिस योद्धा उपक्रमाची चंद्रपूर जिल्ह्यात सुरूवात #bharosa cell - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरोसा सेल :महिला अत्याचार दोषींवर तात्काळ कारवाई करणे आता शक्य ! -भरोसा सेल व पोलिस योद्धा उपक्रमाची चंद्रपूर जिल्ह्यात सुरूवात #bharosa cell

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
जिल्ह्यातील पीडित महिला व बालके यांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिस विभागाने भरोसा सेल सुरू केला आहे. या भरोसा सेल उपक्रमांतर्गत पीडित महिला व बालके यांना एकाच छताखाली समुपदेशन मार्गदर्शन केल्या जात आहे. घरगुती हिंसा, कौटुंबिक समुपदेशन, वाद-विवाद मिटविण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच जिल्हास्तरावर संरक्षण अधिकारी नेमलेले असून, 24 तासाच्या आत दोषींवर कारवाई करणे शक्य होत आहे.

कोरोना संक्रमण काळामध्ये पोलिस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत यासाठी पोलिस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सोमवार, 27 जुलै रोजी करण्यात आला. भरोसा सेल या उपक्रमात पीडित महिला व बालके यांच्याकरिता एकाच छताखाली समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचादेखील त्यांनी यावेळी शुभारंभ केला. 

पोलिस मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पोलिस योद्धा म्हणून सहभागी झालेल्या युवकांना विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पोलिस योद्ध्यांची कीट देण्यात आली. या किटमध्ये टी-शर्ट, आयकार्ड तसेच सुरक्षेविषयीच्या वस्तू देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात पोलिस विभागाने पोलिस योद्धा उपक्रमाद्वारे युवकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. युवकांनी पोलिस योद्धा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील पीडित महिला व बालके यांना आधार देण्याचे काम भरोसा सेलद्वारे होणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पोलिस विभागाला नाका-बंदी, बंदोबस्त पासून तर कोविड केअर सेंटरवरील बंदोबस्तापर्यंत पोलिस विभागाला अनेक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. पोलिस विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी पोलिस योद्धा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील युवकांना पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत यामध्ये 400 युवकांनी सहभाग नोंदवला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच पोलिस दलातील अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सायबर सेलचे मुंडे यांनी केले. दोन्ही योजनेत सहभागी प्रातिनिधिक लोकांना यावेळी कीटचे वाटप व सत्कार करण्यात आला.