कुपोषित बाळांना भरवा बाळू चा घास :सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोडसे यांनीं वडिलांच्या पुण्यतिथी निमित्य कुपोषित बालकांना पुरविला पोषण आहार :बाळू' Be A Part Of Loving Unit - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुपोषित बाळांना भरवा बाळू चा घास :सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोडसे यांनीं वडिलांच्या पुण्यतिथी निमित्य कुपोषित बालकांना पुरविला पोषण आहार :बाळू' Be A Part Of Loving Unit

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सामाजिक -

राजुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोडसे यांनीं बाळू या कुपोषित मुलांना खाद्य सहाय्य पुरविणाऱ्या सहाय्यिकेतून वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक दायित्व जोपासून प्रेरणादायी सामाजिक संदेश दिला आहे. 

काल दिनांक 4 जुलै, स्वर्गीय दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण  स्मृती प्रित्यर्थ त्यांचा  मुलगा सतीश गोडसे सहायक पोलीस निरीक्षक राजुरा पोलीस स्टेशन यांनी  "बाळू "संकल्पनेतून पाच   कपोषित बालकांना पोषण आहाराची भेट दिली. 

सोनूर्ली ग्रामपंचायत येथे बाळू Be A Part Of Loving Unit  या अमित महाजनवार विस्तार अधिकारी  यांचे संकल्पनेतुन पोषण आहाराची बाळू भेट दिली . या प्रसंगी उपसभापती मंगेश भाऊ गुरनुले उपसभापती पंचायत समिती राजुरा, जावेद भाई,सटाले मॅडम , बाळू चे अमित महाजनवार, आकाश चिंचाळकर व अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.