बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत आता आकर्षक बांबू सॅनीटायझर स्टँडची निर्मिती स्वस्त व देखणे स्टँन्ड लवकरच बाजारात #bamboo sanitizer stand will be available soon on market - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत आता आकर्षक बांबू सॅनीटायझर स्टँडची निर्मिती स्वस्त व देखणे स्टँन्ड लवकरच बाजारात #bamboo sanitizer stand will be available soon on market

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आपल्या कल्पकतेसाठी व सामाजिक दायित्वासाठी अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने कोरोना संसर्गाच्या काळात कार्यालयीन व घरी वापरासाठी उपयोगी ठरणारे बांबूचे सॅनीटायझर स्टँड तयार केले आहे. लवकरच बाजारात हे स्टॅन्ड जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिली आहे.
  
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे कार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कौशल्य आधारित रोजगार देणाऱ्या या संशोधन केंद्रातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य प्राप्त झाले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूपासून सामान्य माणसाच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या स्वस्त व आवश्यक टिकाऊ वस्तू तयार करण्याची प्रक्रिया होय. या केंद्रातून आत्तापर्यंत बांबूपासून सायकल, तिरंगी झेंडा, बांबूची तलवार ,बांबूपासून तयार झालेले घरी वापरता येणारे सोफासेट, खुर्च्या - टेबल, याशिवाय या केंद्राची सुप्रसिद्ध बांबूची कव्हर असणारी डायरी देखील प्रसिद्ध आहे.

या केंद्रामार्फत बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. दरवर्षी या ठिकाणी बांबूपासून गणेश मूर्तीची निर्मिती, बांबूपासून राख्या तयार करणे अशा विविध उपक्रमाला राबविण्यात येते. 
style="text-align: justify;">         
मेकॅनिकल इंजिनियर व भारतीय वन सेवेचे सनदी अधिकारी असणारे राहुल पाटील यांच्या कल्पकतेतून याठिकाणी विविध प्रयोग केले जातात. त्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणच्या बांबूपासून वस्तू बनविण्याच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून अनेक वस्तू तयार केल्या जातात. याठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या योगिता साठवणे यांच्या कल्पनेतून बांबू पासून त्यांनी सॅनीटायझर स्टँड तयार करण्याची कल्पना पुढे आली. 

या ठिकाणी डिझायनर म्हणून काम करणाऱ्या किशोर गायकवाड  हस्तशिल्प निर्देशक व राजू हजारे बांबू कारागीर यांनी या कल्पनेला राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात आकार दिला. तसेच सुशील मंतावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नियोजनात काम करण्यात आले . बांबू स्टॅन्ड चर्चेचा विषय असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.