चंद्रपूरची बांबू राखी पोहोचणार पंतप्रधानांपर्यंत : मीनाक्षी वाळके यांची बांबूकला #Bamboo-rakhi-will-be-sent-to-the-Prime-Minister - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूरची बांबू राखी पोहोचणार पंतप्रधानांपर्यंत : मीनाक्षी वाळके यांची बांबूकला #Bamboo-rakhi-will-be-sent-to-the-Prime-Minister

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : व्यवसाय :

चंद्रपूरातून देशभरात लोकप्रिय झालेली बांबूची शुध्द पर्यावरणपूरक राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचा मानस या राखी तयार करणाऱ्या मिनाक्षी वाळके यांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी त्यांनी बनविलेली राखी भाजपच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष विजया रहाटकर आणि वनिता कानडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांधली होती.

संचारबंदीच्या संकट काळात राज्याच्या बांबू क्षेत्राचे सुमारे १ अब्ज ७२ कोटी एवढे नुकसान झालेे. यात बांबूवर गुजराण करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ९ लाख लोकांना याचा मोठा फटका बसला. मात्र, याच काळात चंद्रपूरच्या झोपडपट्टीत राहणा-या बांबू कलावंत मिनाक्षी वाळके यांनी आपल्या प्रतिभेने इतर सम दु:खी महिलांना काम देत, राख्या बनविणे सुरु केले. 

त्यांच्या सुमारे ६ हजार राख्या देशभरात पोहचल्या. बांबूच्या राख्यांना लोकप्रियता मिळवून देणा-या कलावंत मीनाक्षी यांना माजी वन आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले होते. एवढेच नव्हे, गत वर्षी अभिनेता अमिर खान यांच्या हस्ते मिनाक्षी यांच्या बांबू राख्यांच्या स्टॉलचे उद्घाटनही मुनगंटीवार यांनी योजिले होते. पण ते वेळेअभावी होवू शकले नाहीे.

मिनाक्षी म्हणाल्या, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी बांबू कला अवगत केली आणि बीआरटीसीमधून ७० दिवसांचे प्रशिक्षण घेतले. पुढे स्वत:सह इतर महिलांना ही कला शिकवून त्यांना रोजगार देता यावा म्हणून अभिसार इनोवेटिव्ज नावाचा सामाजिक उद्योग सुरु केला. आता साधारण दहा महिलांना यातून रोजगार मिळत आहे. 

आम्ही झोपडपट्टीतल्या महिलांनी तयार केलेली ही विशेष राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचावी आणि त्यांच्या क्लिन इंडिया-ग्रीन इंडिया मोहिमेत आमचाही सहभाग वाढावा, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी प्रयत्न केलेत, तर जिल्ह्यालाही मान मिळेल. 


मिनाक्षी यांना इसरायलच्या जेरुसलेम येथे प्रशिक्षक म्हणून निमंत्रणही मिळाले आहे. एवढेच नव्हे, अमेरिकेच्या दोन संस्थांनी प्रायोजित केलेल्या मीस क्लायमेट या विश्वस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे मुकूट बनवून त्यांनी गत वर्षी इतिहास रचला होता.