बांबूंच्या राख्या आणि आमदार प्रतिभाताई यांचे बंधू प्रेम येत्या काळात हस्तकला उद्योगाला चालना देणार #babmu rakhi manufacturing at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बांबूंच्या राख्या आणि आमदार प्रतिभाताई यांचे बंधू प्रेम येत्या काळात हस्तकला उद्योगाला चालना देणार #babmu rakhi manufacturing at chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आपल्या मनातील बंधू प्रेमाचा हळवा कोपरा जपतानाच आपल्या जिल्ह्यातील बांबू वरील आधारित उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर एका महिला उद्योजकाचा हुरूप वाढवला आहे. या घटनेतून महिला आमदारांचे स्थानिक प्रश्नावरील लक्ष आणि संस्कृती जोपासण्याची धडपड पुढे आली आहे.
      
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती येथील महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपले बंधुप्रेम जपतानाच मतदार संघातील महिला भगिनींच्या उद्योग व्यवसायाला वृद्धी देण्यासाठी थेट त्यांच्या घरी जाऊन कौतुक करण्याची घटना लक्षवेधी ठरली आहे.
 
भाऊ-बहिणीच्या स्नेहाचा धागा घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला आहे. राखीच्या या धाग्याला पर्यावरणपूरकतेची किनार दयायची आणि स्थानिक कलावंताना प्रोत्साहन देण्याचे कार्य प्रतिभाताईनी केले आहे. चंद्रपूर येथील मीनाक्षी मुकेश वाळके यांनी बनवलेल्या बांबूच्या राख्या सध्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या राख्यांच्या प्रेमात आमदार प्रतिभाताई धानोरकर पडल्या आहेत. 

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ओळख वनाचा जिल्हा अशी आहे. यापासून हस्त कलेच्या माध्यमातून राख्या तयार करण्याची कल्पना मीनाक्षी मुकेश वाळके यांना सुचली.  त्यांनी बांबू पासून राख्या तयार केल्या.  देशातील दिल्ली, झारखंड, जबलपूर, ठाणे, पुणे, मुंबई, गुडगाव येथून राख्यांची मागणी आली. यामध्ये  आतापर्यंत तब्बल 5 ते 6 हजार राख्यांची विक्री करण्यात आली आहे. या राख्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन या हस्तकला उद्योगाला चालना देण्याकरिता मी सदैव तत्पर असल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.  
      
चंद्रपूर जिल्ह्यातील  बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र  याठिकाणी प्रशिक्षित झालेल्या शेकडो महिला सध्या बांबू पासून वेगवेगळ्या  कास्ट शिल्पाची  निर्मिती करतात  यातून  मोठ्या प्रमाणात  जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे  याच ठिकाणी प्रशिक्षित एका महिला उद्योजकाला   आमदाराच्या थेट घरी  येण्याचा सुखद आनंद भेटला आहे.

 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नुकतेच बांबूपासून राख्या बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या  मीनाक्षी मुकेश वाळके यांचे घर गाठले. त्यांनी त्यांच्याकडील विक्रीला असलेल्या राख्या बघताच त्यांना बांबूच्या राख्यांची भुरळ पडली. त्यांनी ह्या राख्या खरेदी करून इतरही महिलांना पर्यावरणपूरक राख्या खरेदी करून हस्त कला उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. 

या महिलांनी आपल्या कला-कौशल्यातून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करण्यासाठी बांबू, नैसर्गिक रंग, विविध रंगाचे रेशम धागे, लाकडी मनी या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामुळे राख्या अधिक आकर्षक असल्याने याची मागणी हळूहळू वाढू लागली आहे.

या भागातील महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळावा व त्यांच्या कलेला प्रेरणा मिळावी यासाठी सर्वानी ह्या राख्या खरेदी कराव्यात, त्यासोबतच कंदील, शोभेच्या वस्तू व इतर येणाऱ्या सणानुसार पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्यात येत असतात. यातून या महिलांना चांगला रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येसुद्धा नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. रोजगाराच्या मोठा प्रश्न या उद्योगातून सुटला जाऊ शकतो. त्यामुळे या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करेल अशी ग्वाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.