जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे आर्सेनिक अल्बम औषध वितरण #arsenic album 30 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे आर्सेनिक अल्बम औषध वितरण #arsenic album 30

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :  

जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती संवर्धक औषधाचे वितरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी संपन्न झाले.

कोविड 19 संकमणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती संवर्धक औषधाचे वितरण शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांना या औषधाचे वितरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या शुभहस्ते झाला. 

या प्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात कार्यालय प्रमुखांना सदर औषधाचे वितरण करण्यात आले.त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना सुध्दा औषध देण्यात आले. सदर औषध घेण्याची पद्धत, डोस, वेळ, पथ्य याबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त सविस्तर माहितीपत्रक सुद्धा सर्वांना देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे.सोशल डिस्टन्सिंग  पाडावे व सदर औषधाचे सूचनेप्रमाणे सेवन करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले आहे.