कु.तन्वी सौ.वनिता रवी आसूटकर ने दहावीत 96.60 % मिळविले घवघवीत यश #10th-topers - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कु.तन्वी सौ.वनिता रवी आसूटकर ने दहावीत 96.60 % मिळविले घवघवीत यश #10th-topers

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कु.तन्वी सौ.वनिता रवी आसूटकर  हिने दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण घेऊन नारायणा विद्यालयम चंद्रपूर (पडोली) या शाळेतून तिने प्रथम क्रमांक मिळविला
    
कु.तन्वी सौ.वनिता रवी आसूटकर हि नारायणा विद्यालयम सीबीएसई चंद्रपूर(पडोली)येथील विद्यार्थीनी असून मार्च २०२० मध्ये झालेल्या सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत तीने ९६.६० टक्के गुण मिळवून नारायणा विद्यालयम चंद्रपूर या शाळेतून पहिली आली आहे.
    
तन्वीला विषयानुसार मिळालेले गुण अनुक्रमे इंग्रजी ९८, हिंदी ९८, गणित ९६, विज्ञान ९५, सामाजिक शास्त्र ९६ असे गुण असून  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये १०० पैकी १०० गुण आहे हे विशेष.
    
तन्वी आसूटकर हि चंद्रपूर जिल्हा केमिस्टअसोसिएशनचे उपाध्यक्ष (ग्रामीण)तसेच ए टू झेड मेडिकल एजन्सी चे संचालक श्री रवी आसूटकर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या सौ.वनिता आसूटकर यांची मुलगी आहे.
       
तन्वीला चांगले यश मिळावे  यासाठी उच्च शिक्षित आई वनिता आसूटकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते तसेच वडील रवि आसूटकर यांनी सुद्धा व्यवसाय सांभाळून तन्वीला बदलत्या काळानुसार बदलावे लागते आणि अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे असते असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते.
   
नारायणा विद्यालयम शाळेच्या प्रिंसिपल  श्रबोनी ब्यानर्जी व  शिक्षिका, शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन तन्वीला मिळाले.एवढ चांगलं यश आणि शाळेत प्रथम क्रमांक  मिळाला यामध्ये आई-वडील,प्रिन्सिपल, शिक्षिका, शिक्षक यांचे सुध्दा श्रेय असून सर्वांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाले असे तन्वीने सांगितले. 
         
पुढे तन्वीला डॉक्टर बनायचे आहे. तिचे अनेकांकडून कौतुक होत असून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तिचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.