9 जुलै पासून राज्यातील दुकानें सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहणार : राज्य सरकारचा वाढीव निर्णय #maharashtra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

9 जुलै पासून राज्यातील दुकानें सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहणार : राज्य सरकारचा वाढीव निर्णय #maharashtra

Share This
खबरकट्टा / मुंबई;-

राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी 2 तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या, 9 जुलैपासून राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, असे आदेश मुख्य सचिवांनी काल काढले आहेत. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. 

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमधील कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील 7 दिवस परवानगी देण्यात आली आहे. या क्षेत्रातील दुकानांना पी वन-पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. आता यात 2 तास वाढवून दिलेले आहेत. 

तर राज्याच्या उर्वरित भागात आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी 2 तास वाढवून देण्यात आले आहेत. मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील 7 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. 

नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासनाकडून संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद केली जातील. दुकाने किंवा मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या 2 तास वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.