नागभिड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव पारित : सभापती सौ प्रनाया गड्डमवार आणि उपसभापती रवी देशमुख यांना 6 महिन्यात पायउतार : अविस्वस प्रस्ताव 6 विरुद्ध 2 सदस्य ने पारित #nagbhid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागभिड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव पारित : सभापती सौ प्रनाया गड्डमवार आणि उपसभापती रवी देशमुख यांना 6 महिन्यात पायउतार : अविस्वस प्रस्ताव 6 विरुद्ध 2 सदस्य ने पारित #nagbhid

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्यावर आज १४ जुलै रोजी १२ वाजता सुरू झालेला अविस्वस प्रस्ताव ६ विरुद्ध २ सदस्य ने पारित करण्यात आला आहे.

नागभिड पंचायत समिती मध्ये काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. भाजपचे २ आणि १ सदस्य अपक्ष असताना काँग्रेसने भाजपाच्या दावणीला बांधून सभापती सौ प्रनाया गड्डमवार आणि उपसभापती रवी देशमुख यांना ६ महिन्यात पायउतार व्हावे लागले. 

सभापती सौ. प्रनाया गड्डमवार ह्या स्वतःचे मर्जीने निर्णय घेतात, पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेत नाही, कर्मचारी यांचेशी बेशिस्त पने वागतात असा ठपका ठेवत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे प्रस्ताव सादर केला असताना त्यावर आज पीठासन अधिकारी क्रांती डोंबे उप विभागीय अधिकारी यांनी सभा घेतली आणि तसा ठराव पारीत करून पुढील कार्यवाही सादर केला आहे. 

नागभिड पंचायत समिती काँग्रेसचे वर्चस्व असताना भाजपाच्या दावणीला कांग्रेस बांधली जाणे हा विषय काही नवा नाही.शिवाय काँग्रेसने कोणत्या कारणास्तव हात मिळवणी केली हे येणारा काळच ठरवेल. सध्यातरी कांग्रेस व भाजप तालुका अध्यक्ष स्पर्धा करीत असल्याचे बोलले जात.