कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 52 गोवंशांना पोलिसांनी दिले जीवनदान #cow-smuggling - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 52 गोवंशांना पोलिसांनी दिले जीवनदान #cow-smuggling

Share This
⭕️विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत कविटपेठ येथील घटना
⭕️जप्त करण्यात आलेली जनावरे गोवंश उज्ज्वल गोरंक्षण संस्था लोहारा (चंद्रपूर) येथे केली हस्तांतरित

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - विरूर स्टेशन -


कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाचा कळप दावणीला बांधून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे काल (दिनांक 4 जुलै )रात्री पोलिसांनी कवीटपेठ येथे टाकलेल्या धाडीत तेलंगणा राज्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने नेण्यात येणारे 31 नग लहान मोठे गोरे, 21 नग गायी व कालवड असा एकूण 52 (किं 339000 रुपये) गोवंशांना ताब्यात घेतले. हि कारवाई एसडीपीओ स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात विरुर स्टेशन पोलिसांनी केली.

या परिसरात मागील अनेक दिवसांपासून जनावरे तस्करांची टोळी सक्रिय होती. लॉकडॉउन नियमांना धाब्यावर मांडून जनावर तस्करीचे मोठे घबाड सुरू होते. अशी माहिती एसडीपीओ स्वप्नील जाधव यांना मिळाली. जनावरे जंगलालगतच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. 

या माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत पोलिसांना राजुरा तालुक्यातील विरुर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मौजा कविटपेठ येथे जंगलालगतच्या परिसरात निष्पाप मुकी जनावरे निर्दयीपणे बांधून असल्याचे मिळाले. हि जनावरे पोलिसांनी जप्त करून गोवंश उज्वला गोरंक्षण संस्था लोहारा (चंद्रपूर) येथे दाखल करण्यात आली आहे.

राजू नक्कावार रा. कविटपेठ व सैय्यद अली रा. लक्कडकोट या दोन आरोपी विरोधात अप. क्र. 257/20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मा. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजुराचे स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि कृष्णा तिवारी, पोउपनी सदानंद वडतकर, सहा फौज सफदरखा पठाण, पोशी विजय तलांडे, पोशी भगवान मुंडे, पोशी अशोक मडावी, पोशी लक्ष्मीकांत खंडाळे सर्व पोलीस स्टेशन विरुर यांनी केली.