51 हजार रुपयाचे चोर बीटी कापूस बियानासह एका आरोपीस अटक.#BT-cotton - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

51 हजार रुपयाचे चोर बीटी कापूस बियानासह एका आरोपीस अटक.#BT-cotton

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. त्याच अनुषंगाने शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली.शेतकर्‍यांच्या ह्या गरजेचा फायदा व्यापारी मोठ्या प्रमाणात घेत असतात. त्यामुळे चोर बीटी बियाण्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. 

 दिनांक 4 जुलै 2020 रोजी राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधपणे चोर बीटी बियाण्यांची वाहतुक करताना एका युवकास पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घेतलेल्या झडती दरम्यान मुद्देमालासह अटक केली आहे.

आदेश - 24, काव्या - 25, राशी - 19 या नावे बोगस चोर बीटी बियाणे असे एकूण पाकिटे 68 असा एकूण  रक्कम 51000 चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले व आरोपी प्रफुल्ल मनोहर गिरसावळे वय वर्षे 31 यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. 

यावेळी श्री. नरेंद्र कोसुरकर पोलीस निरीक्षक राजुरा, श्री. गोविंद मोरे उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा, श्री. प्रशांत साखरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजुरा, श्री. गुलाब कडलग तालुका कृषी अधिकारी राजुरा, श्री. चेतन चव्हाण मंडळ कृषी अधिकारी देवाडा, संपत पुलीपाका पोलीस शिपाई व प्रवीण उवरे पोलीस शिपाई उपस्थित होते.