गाळेधारकांचे भाडे रद्द करा मालमत्ता करात 50 टक्के सूट द्या रामू तिवारी यांची मागणीCancel-the-rent-of-the-landlord.l - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गाळेधारकांचे भाडे रद्द करा मालमत्ता करात 50 टक्के सूट द्या रामू तिवारी यांची मागणीCancel-the-rent-of-the-landlord.l

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद होत्या. येथील मालमत्ताधारक मध्यम वर्गीय आहेत. तीन महिने बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आले. त्यामुळे गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा, मालमत्ता करात 50 टक्के सूट घ्या, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांना दिले.

मागण्यांची पूर्तता न केल्यास जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही तिवारी यांनी निवेदनातून दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. सलग तीन महिने व्यवसाय बंद होता. टाळेबंदीत काहीशी शिथिलता देत बाजारपेठ सकाळी 10 ते 5 या कालावधीत सुरू करण्यात येत आहे. 

त्यातही अपेक्षित उत्पन्न पदरी पडत नाही. त्यामुळे गाळेधारकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. आता गाळ्यांचे भाडे द्यायचे कसे, या विवंचनेत गाळेधारक सापडले आहेत. शहरातील मनपा अंतर्गत येणारे गोल बाजार, टिळक मैदान, आझाद बगिचा नेहरू मार्केट, संजय गांधी मार्केट, जटपूरा कांजी, नेताजी नगर भवन, सुपर मार्केट भिवापूर, महाकाली मंदिर मार्केट, इंदीरा नगर मार्केट, गंज वार्ड, रामाळा तलाव, राजकुल मार्केट, व्यापार संकुल, सराई मार्केट आदी ठिकाणांवरील गाळे धारकांचे भाडे माफ करण्यात यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात महिला शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, गोपाल अमृतकर, पप्पू सिद्धीकी, दुर्गेश कोडाम, एकता गुरले, एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे आदींची उपस्थिती होती.