चंद्रपूर रुग्ण -403 : आज जिल्ह्यात 7 बाधितांची नोंद, 244 कोरोनातून बरे ; 159 वर उपचार सुरु : पॉसिटीव्ह टू नेगेटिव्ह : 24 रुग्णांना आज सुट्टी #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर रुग्ण -403 : आज जिल्ह्यात 7 बाधितांची नोंद, 244 कोरोनातून बरे ; 159 वर उपचार सुरु : पॉसिटीव्ह टू नेगेटिव्ह : 24 रुग्णांना आज सुट्टी #covid-19

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची ३९६ संख्या रविवारी सायंकाळ पर्यंत ४०३ वर पोहोचली आहे.

जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४४ झाली असून गेल्या चोवीस तासात आज २४ बाधितांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 159 बाधितावर उपचार सुरू आहे.


जिल्ह्याचा डब्लिंग रेट सध्या १५.३ आहे.आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०२ रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,ब्रह्मपुरी, कोरपना, नागभिड, गडचांदूर या शहरांमध्ये १४० रूग्ण आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या १५५ आहे.