राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी #lockdown

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे.


अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या गाईडलाइंसमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच. 


दरम्यान, देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. 


⭕️ राज्यात काय सुरु काय बंद?

◾️मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी
◾️5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणार
◾️मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार
◾️ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी
◾️सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी
◾️अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार
◾️अनावश्यक सेवेती ज्या दुकानांना याआधी परवानगी देण्यात आली होती तेदेखील सुरु राहतील.
◾️टॅक्सी, कॅब,चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 3
रिक्षा – चालक + 2
दुचाकी – चालक + 1

नुकतंच केंद्र सरकारने ‘अनलॉक 3’ च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक 3 च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी 5 ऑगस्टपासून जिम सुरु करता येणार आहे. मात्र त्यांना कडक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

⭕️ देशभरात काय सुरु, काय बंद?


◾️कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन
जीम उघडण्यासाठी परवानगी
◾️नाईट कर्फ्यू हटवला
◾️31 ऑगस्टपर्यंत शाळा बंदच राहणार
◾️मेट्रो, लोकल ट्रेन बंदच राहणार
◾️शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार
◾️ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहणार
◾️सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, ◾️बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंदच राहणार
◾️आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.
◾️सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ ◾️सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल. (Maharashtra Lockdown Guidelines