रहिवासी अतिक्रमण धारकांना शासकीय पट्टे न मिळाल्यास आमरण उपोषण : 30 वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमण धारकांना आवास योजनांचा लाभ नाही :प्रशांत अशोकराव येल्लेवार ता.महामंत्री भाजपा ओबीसी यांचा ईशारा #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रहिवासी अतिक्रमण धारकांना शासकीय पट्टे न मिळाल्यास आमरण उपोषण : 30 वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमण धारकांना आवास योजनांचा लाभ नाही :प्रशांत अशोकराव येल्लेवार ता.महामंत्री भाजपा ओबीसी यांचा ईशारा #gondpipari

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

गोंडपिपरी नगरपंचायत क्षेत्रातील आबादी जागेतील मागील ३० वर्षा पासून अनेक कुटुंबे वास्तव्यात राहत आहे. सदर जागेचे शासकीय पट्टे न मिळाल्याणे नगरपंचायत मार्फत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लाभ देण्यात येत नाही तसेच सदर योजने अंतर्गत जागेची मोजणी दिनांक ०८/०५/२०१९ रोजी भूमि अभिलेख कार्यालय गोंडपिपरी यांनी केली असून संबधित नगरपंचायतनी भूमि अभिलेख कार्यालय गोंडपिपरी यांना मोजणीची रक्कम भरणा न केल्याने त्याबाबतचा अहवाल हा भूमि अभिलेख कार्यालय नगरपंचायतीकडे पाठवत नाही व नगरपंचायत कार्यालय हे पंतप्रधान आवास योजनेचा प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहे. 

त्यामुळे गरीब जनतेचे शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ मिळत नाही तसेच तहसिल कार्यालय मार्फत अतिक्रमण दंड प्रतेकी २०००/- रूपये याप्रमाणे दंड भरणा केलेला आहे परंतु अध्यापही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ व शासकीय पट्टे मिळालेले नाही. 

गरीब जनतेचा तात्काळ विचार करूण पट्टे व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळण्याचा दृष्टीने कार्यवाही व्हावी या उद्देशाने तसेच उपरोक्त मागणी पुर्ण न झाल्यास दिनांक १७/०८/२०२० रोजी आमरण उपोषण करण्याचा ईशारा श्री प्रशांत अशोकराव येल्लेवार ता.महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा गोंडपिपरी यांनी आज 31 जुलै ला निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.