हॉटस्पॉट चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक 30% बाधित रुग्ण तर ब्रम्हपुरी 17% दुसऱ्या क्रमांकावर :सावली, जिवती कोरोनामुक्त तालुके : एकूण रुग्ण 123 #covid-19-hotspot-of-chandrapur-district- - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हॉटस्पॉट चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक 30% बाधित रुग्ण तर ब्रम्हपुरी 17% दुसऱ्या क्रमांकावर :सावली, जिवती कोरोनामुक्त तालुके : एकूण रुग्ण 123 #covid-19-hotspot-of-chandrapur-district-

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

आजघडीला जिल्ह्यातील एकूण 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 37 रुग्ण म्हणजेच 30 टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील तर 17 टक्के  ब्रम्हपुरी तर सावली, जिवती कोरोनामुक्त तालुके आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तोदेखील चंद्रपूरचाच. त्यानंतर चंद्रपूर तालुक्यात रुग्णाचा आलेख वाढतच राहिला. आजघडीला जिल्ह्यातील एकूण 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 37 रुग्ण म्हणजेच 30 टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आहेत. या तालुक्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता हॉटस्पाट ठरू लागला आहे. या तालुक्यात 21 रुग्ण आढळले आहेत.

कोरोना संसर्गामुळे 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन झाले. सहाजिकच चंद्रपूर जिल्हाही लॉकडाऊन झाला. मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्तच राहिला. मात्र त्यानंतर 2 मे रोजी चंद्रपुरातील कृष्णनगर परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जिल्ह्यात विशेषत चंद्रपुरात खळबळ उडाली. याच कालावधीत मजुरांचे जिल्ह्यात परत येणे सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येणे सुरू झाले. असे असले तरी चंद्रपूर तालुक्यातील रुग्णांचा आलेख सातत्याने वाढतच राहिला. 

चंद्रपूर शहरासह तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर, उर्जाग्राम, वरवट, आरवट, घुग्घुस या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारपर्यंत चंद्रपूर तालुक्यात एकूण 37  रुग्णांची नोंद आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुका रुग्णांबाबत संवेदनशिल ठरला आहे. या तालुक्यात सोमवारपर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 123 रुग्णांपैकी 37 चंद्रपूर तालुका, 21 ब्रह्मपुरी तालुका तर उर्वरित 65  रुग्ण इतर ग्रामीण भागातील आहेत.


जिल्ह्यातील सावली, जिवती हे या दोन तालुक्यातील एकाही गावात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. या तालुक्यातदेखील बाहेर राज्यातून व जिल्ह्यात अनेक कामगारवर्ग परत आला आहे. मात्र त्यातील कुणालाही आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे हे तालुके सध्यातरी कोरोनामुक्त आहेत.