3 महिन्यांचे एकत्रित वीज बिल होणार रद्द #nitin raut - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

3 महिन्यांचे एकत्रित वीज बिल होणार रद्द #nitin raut

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -

वाढीव वीज बिले व लॉकडाऊन कालावधीतील वीज बिले यातील संभ्रमाच्या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेतली. त्यानुसार लॉकडाऊन कालावधीतील 3 महिन्यांचे एकत्रित घेतलेल्या रीडिंगची विभागणी करून प्रतिमास युनिटनुसार बिल दुरुस्त करून देण्याचे आदेश दिले आहेत. 

याबाबत लवकरच परिपत्रक जाहीर करणार असल्याचेही त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळास सांगितल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग, व्यापार विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष मालपाणी यांनी पत्रकाद्वारे दिली.

राज्यातील ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीतील 3 महिन्यांचे एकत्रित वीज बिल देऊन महावितरण कंपनी ग्राहकांची फसवणूक आणि लूट करीत आहे. 

त्यामुळे वीज दरवाढ मागे घ्यावी, वीज बिलाची 4 भागात विभागणी करून नव्याने बिल द्यावे, या मागणीसाठी मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, मालपाणी, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, आदींच्या शिष्टमंडळाने मंत्री राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी  वीज बिलाबाबत मंत्री राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. 

मंत्री राऊत यांनी बिले दुरुस्त करून देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 3 कोटी वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या ग्राहकांना वीज बिलासंदर्भात तक्रार असेल त्यांनी महावितरण कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहनही मालपाणी यांनी केले आहे.