चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद #covid-19

Share This
◼️ चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467
◼️ 293 कोरोनातून बरे ; 174 वर उपचार सुरु
◼️ 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद.

खबरकट्टा / चंद्रपूर दि. 29 जुलै : 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 467 झाली आहे. 293 बाधित बरे झाले असून 174 बाधितावर उपचार सुरू आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या 20 बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर शहर येथील नागरिकांचा समावेश आहे .

आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या गंभीर आजाराने दाखल करण्यात आलेल्या टेकाडी परिसर मुल येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नागभिड येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारे हृदयरोगाने आजारी असणारे 51 वर्षीय व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील 38 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.
सिंदेवाही येथील जयस्वाल कॉलनी निवासी 48 वर्षीय नागरिकाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
घुगुस शहरातील रामनगर परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 48 वर्षीय महिलेचा अँटीजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाळा दत्त मंदिर येथील आधीच्या पॉझिटिव रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 4 पुरूष पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे.