श्रावणात भाज्यांची टंचाई : पावसाळ्यातील पौस्टिक भाजी कटवाल /काटवलं /कंटोला तब्बल 200रुपये किलो #Vegetables are expensive: Shortage of vegetables in Shravan - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्रावणात भाज्यांची टंचाई : पावसाळ्यातील पौस्टिक भाजी कटवाल /काटवलं /कंटोला तब्बल 200रुपये किलो #Vegetables are expensive: Shortage of vegetables in Shravan

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :आहार -


पावसाळा सुरू झाला आहे आणि मागच्या मंगळवारपासून श्रावण महिनाही सुरू झाला आहे. अनेकांचा शाकाहार सुरू होऊन भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाउनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहे.


या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर किलोमागे ५० ते ६५ रुपये झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपला खिसा रिकामी करावा लागत आहे. श्रावण महिन्यात भाज्यांची आवक वाढली नाही तर टंचाई अधिक जाणवण्याची शक्यता आहे.


घाऊक बाजारात अजूनही २५० ते २७० गाड्या भाजीपाला येत आहे. तोही किरकोळ बाजारात व्यवस्थिपणे पोहोचत नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचण येत आहे. सध्या घाऊक बाजारात अनेक पसंतीच्या भाज्यांचे दर मागच्या महिन्यापेक्षाही अधिक वाढले आहेत. मागच्या महिन्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच ४० ते ५० रुपये किलो झाल्या होत्या. तर आता हे दर ६५ रुपये किलोच्या घरात गेले आहेत. हे दर असेच वाढतच राहिल्यास श्रावणात ग्राहकांना महागड्या भाज्या खरेदी कराव्या लागण्याची शक्यता आहे. 

सध्या घाऊक बाजारात फरसबी सिमला मिरची ४० ते ४५ रुपये किलो, शेवगा शेंग ४५ ते ५० रुपये किलो, टोमॅटो ३५ ते ४० रुपये किलो, हिरवा वाटाणा ५५ ते ६५ रुपये किलो, हिरवी मिरची ४० ते ४५ रुपये किलो आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. 


तर इतर भाज्या म्हणजे भेंडी २५ ते ३० रुपये किलो, कारली २८ ते ३० रुपये किलो, परवल २६ ते ३० रुपये किलो, भोपळा १६ ते २० रुपये किलो, वालवड ३६ ते ४० रुपये किलो आहे. प्रत्येक भाजीत किलोमागे १० ते २० रुपयांची वाढ आहे.

त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात गेले आहेत. पावसाळ्यातील अनेकांची आवडती व औषध युक्त भाजी कंटोला (काटवलं ) 200 रुपये किलो विकल्या जात आहे. ज्या घेण्यासाठी सर्वसामान्यांना आपले पाकीट रिकामी करावे लागत आहे.  


श्रावण महिना सुरू असून या काळात तर भाजीपाल्याची मागणी नेहमीपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी अधिक असते त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक वाढण्याची गरज आहे. भाजीपाल्याची आवक वाढली तरच त्याचे दर नियंत्रणात येतील, असे मत अनेक व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या आवक कमी असल्याने दर वाढलेले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.