200 युनिट वीज देयक माफीसाठी समिती गठित :उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन #Committee-formed-for-waiver-of-200-units-electricity-bill.html - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

200 युनिट वीज देयक माफीसाठी समिती गठित :उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन #Committee-formed-for-waiver-of-200-units-electricity-bill.html

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर  महाऔष्णिक वीज केंद्र आहे. कोळश्यापासून मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन याठिकाणी होते आणि त्याची झळ येथील नागरिकांना बसते. अशावेळी या वीज उत्पादक जिल्ह्यातील नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी, अशी मागणी आहे. 

याबाबत राज्य शासनाचे धोरण विचारले असता, उर्जामंत्र्यांनी 200 युनिट वीज माफीसंदर्भात एक समिती गठित केली असून, या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उर्जा, नगर विकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथेे दिली.

चंद्रपूरच्या दौर्‍यावर असताना त्यांनी येथील वीज देयकांच्या तक्रारीसंदर्भात, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात शंका-कुशंकांवर चर्चा केली. त्यानंतर महानगरपालिकेला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, विजेचे देयक टाळेबंदीच्या आणि उन्हाळ्यातील असल्याने जास्त वाटते असेल. 

शिवाय, 1 एप्रिलपासून एमईआरसीच्या निर्देशाप्रमाणे विजेची दरवाढ झाली आहे, त्यामुळेही जास्त वाटत असेल, असे सांगितले. पण कोरोनाच्या संकटसमयीच ही दरवाढ का केली, यावर एमईआरसीच्या निर्देशाला डावलता येत नसल्याची हतबलता त्यांनी कबुलली. यावेळी महानगराचे आयुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते.

विजेचे देयक एवढे कसे आले, याबाबत महावितरण कंपनी जी आकडेमोड करून स्पष्टीकरण देत आहे, ते खुप क्लिष्ट असल्याचे तनपुरे यांनी मानले. ही पध्दत सोपी करण्याची आवश्यक्ता असून, मुळात ‘कंज्युमर केअर’च अधिक प्रभावी करण्याची गरजही त्यांनी यावेळी प्रतिपादित केली. 

कृषी विषयक उर्जा धोरणातही बदलाची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, लवकरच आम्ही कृषी विषयक उर्जा धोरण आणू. त्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना युध्दपातळीवर राबवू, जेणेकरून शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकेल.वीज देयक भरण्यासाठी तीन टप्पे पाडून देण्यात आले असून, ते येत्या सप्टेंबरपर्यंत चालू शकतेे. 

महानगरातील विजेच्या खांबावर कुठलाही कर महानगराकडून वसुलण्याचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर अमृत योजनेबाबत आढावा घेतला जाईल आणि गरज भासल्यास कंत्रादारावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी योवळी दिला. 

कोरोनाबाबत मुंबईत सुरूवातीच्या काळात नियोजन चुकले असेल, कारण त्यावेळी कुणालाच काहीच माहित नव्हते. हे नवेच संकट होते. पण आता सारी व्यवस्था सुरळीत झाली असल्याची ग्वाहीही तनपुरे यांनी यावेळी दिली.

कोरोना काळातील तीन महिन्यांचे विजेचे देयक सर्वसामन्यांचे कंबरडे मोडणारे असताना आणि हे देयक माफ करण्याची मागणी जोेर धरत असताना, या देयकांची रक्कम भरण्यासाठी केवळ तीन टप्पे पाडून देण्याचीच सूट दिली गेली असून, देयक माफ करण्याचा कोणताही निर्णय नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केले.

तर दुसरीकडे, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या वीज ग्राहकांनी या थकित देयकांची जवळपास 90 टक्के रक्कम अदा केल्याचा दावाही तनुपरे यांनी यावेळी केला.