चंद्रपूर जिल्ह्यात आणखी 17 नवे रुग्ण : 24 तासात 32नवे रुग्ण #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी 17 नवे रुग्ण : 24 तासात 32नवे रुग्ण #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर या भागात १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे.आज दुपार पर्यंत जिल्ह्यात नवीन १७ कोरोना बाधित आढळून आले. 

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६० वर पोहोचली आहे. आतापर्यंत अक्टिव्ह रुग्णांची संख्या ११२ असून पूर्णपणे बरे झालेले रुग्णांची संख्या १४८ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरची संख्या वाढविण्यासाठी नवीन इमारती तयार ठेवण्याचीही तयारी प्रशासना द्वारे करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 17 व आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालानुसार 15 असे एकुण 32 रुग्ण 24 तासाच्या आत उघडकीस आल्याने प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.