🩸🩸रक्तदान श्रेष्ठदान :161 नागरिकांनी रक्तसेवा पुरवत साजरा केला आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस : श्री. राहुल पावडे मित्र परिवाराचा यशस्वी सेवाभाव #sudhirmungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

🩸🩸रक्तदान श्रेष्ठदान :161 नागरिकांनी रक्तसेवा पुरवत साजरा केला आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस : श्री. राहुल पावडे मित्र परिवाराचा यशस्वी सेवाभाव #sudhirmungantiwar

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

यंदा कोरोनाच्या संकटाने अवघे मानवी जीवन विस्कळीत झाले आहेे. अशावेळी सर्वसामान्यांना आधार देणे ही काळाची गरज आहे. नव्हे, ईश्वरीय कार्यच आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा भर राजकारणाशिवाय समाजकारणावर जास्त असतो आणि म्हणूनच  त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यंदाचे वर्ष सेवा वर्ष म्हणून राबविण्याचे ठरवले आहे.  आज  30 जुलै 2020, भाऊंच्या वाढदिवशी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध सेवाभावी कार्य आयोजन कार्यकर्त्यांनी केले.

त्या अंतर्गत जनतेसाठी निशुल्क कोविड अ‍ॅटीजन तपासणी, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन, रक्तदान शिबिर,  तसेच चंद्रपूर महानगरातील 1000 प्रतिष्ठानाला सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कार्याचे माहिती पुस्तिका व सुरक्षा किट, वाहतूक पोलिसांना सुरक्षा किट तथा आर्सेनिक गोळ्या तसेच फेस शिल्डचे करण्यात आले.
 
त्याचप्रमाणे जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना, अटल पेंशन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, डिजीटल इंडिया, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जनऔषधी योजना आदी योजनांची माहिती गरजूंना पुरवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. 
 
याच अनुषंगाने चंद्रपूर मनपा उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती,चंद्रपूर शहरातील भाजपचे सक्रिय व युवकांचे मार्गदर्शक श्री. राहुल पावडे यांच्या मित्रावरीवाराच्या वतीने आज दिनांक 30 जुलै उत्तुंग , अविचल आणि कर्तव्यतत्पर मा.आ.श्री सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री, वित्त, नियोजन व वने (महाराष्ट्र राज्य) तथा पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांच्या वाढदिवसानिमीत्य दिर्घायूची प्रार्थना रुग्णसेवेचे व्रत घेत रक्तदान शिबीर आयोजित करून शहरातील नागरिकांना रक्तदान करत सेवाव्रत पूर्ण करण्याचे आवाहन श्री. पावडे यांनी केले होते. 

गत चार वर्षा पासून लोकनेत्याच्या जन्मदिनानिमित्य नियमितपणे या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राहुल पावडे व मित्र परिवारा तर्फे घेण्यात येते. आज मातोश्री लॉन ,जगन्नाथ बाबा नगर येथे संपन्न झालेल्या सेवाभावी आयोजनात सुधीर भाऊंच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा वारसा पुढे नेत चंद्रपूर शहरातील 161 रक्तदात्यांनी रक्तदानाचे महान कार्य केले. 

या सेवादनास भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष देवराव भोंगळे ,महापौर राखिताई कंचर्लावार,चंद्रपूर महानगर अध्यक्ष मंगेश गुलवाडे, भाजप जेष्ठ नेते राजेंद्र गांधी,युवा मोर्चा जिल्ह्याध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,भाजपा नेते प्रकाश धारने, दत्तप्रसन्ना महादानी,प्रशांत विघ्नेश्वर व भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविकानीं मौलाचे योगदान दिले. 

कोवीड-19 चा प्रादुर्भाव व रुग्णांना भासणारी रक्त, प्लाझ्मा ची गरज सतत पूर्ण होत राहून सुधीर भाऊंच्या सेवाव्रताचा वारसा अखंड चालत ठेवण्यास आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. आजच्या वाढदिनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा आम्ही या सेवाकार्यातून देऊ इच्छितो - श्री. राहुल पावडे, उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती-मनपा, चंद्रपूर