राष्ट्रवादी काँग्रेस ची सरपंच भरती स्कीम : 11000 द्या गावात सरपंच बना... !!!! लोकशाहीची होळी #NCP - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी काँग्रेस ची सरपंच भरती स्कीम : 11000 द्या गावात सरपंच बना... !!!! लोकशाहीची होळी #NCP

Share This

खबरकट्टा /महराष्ट्र :  राजकीय रंग -

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे निकष राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार सध्याच्या ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. योग्य व्यक्‍तीची प्रशासक म्हणून निवड केले जाईल, असे शासन आदेशात म्हटले आहे, मात्र सध्या सर्वच ग्रामपंचायीतत योग्य व्यक्तीची ही व्यक्ती पालकमंत्र्याच्या मर्जीतील असणार असे चित्र स्पष्ट झाले असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ने थेट सरपंच भरतीच सुरु केली आहे. 

याचा पुरावा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षानां जारी केलेले पत्र सोशल मीडिया वर काल पासून प्रचंड वायरल असून त्यात पुणे जिल्हयातील 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे, अशा 750 ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रशासक म्हणून एका व्यक्तीच्या नेमणूकीसाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत केलेले आहे.

तरी सर्व तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकांच्या याद्या घेऊन प्रशासक म्हणून नियुक्ती करणेसाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये उमेदवाराचा अर्ज घेऊन त्यासोबत इच्छुक उमेदवाराकडून रू. 11, 000/- इतकी विनापरतीची रक्कम पक्षनिधी म्हणून घेऊन ती रक्कम पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत खात्यामध्ये जमा करून त्याची पावती (झेरॉक्स प्रत) अर्जासोबत जोडून ते सर्व अर्ज तालुका अध्यक्षांनी तारीखनिहाय दिनांक 20/07/2020 पर्यंत जिल्हाध्यक्षांकडे दोन प्रतीत सादर करावी असे म्हटलेले आहे. 
राज्यात येत्या वर्षभराच्या कार्यकाळात 14314 ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असून जगात सुरु असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने गावपातळीवर योग्य व्यक्तीची निवड प्रशासक /सरपंच पदी करण्याचा शासकीय अध्यादेश निघालेला असून याचे सर्व अधिकार जिल्हा परिषद मुख्याधिकारी व पालकमंत्र्यांना देण्यात आल्याने यात मोठया प्रमाणात घोडेबाजार होणे निश्चित असल्याने गावपातळीवर सर्वपक्षीय नाराजगीचा सुर आहे. 

शिवाय विरोधक या शासकीय निर्णयाला भाजप जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असतानाच राज्यभर ज्वलंत चर्चेच्या या विषयाला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्षाच्या वायरल झालेले हे पत्र गावागावात लोकशाहीची होळी पेटवन्याचे काम करीत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राची चौकशी करावी या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले आहे. 


कोरोनाचे संसर्गाचे कारण सांगून डिसेंबर पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून अनिश्चित काळासाठी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कोरोनाचे संकट किती दिवसात संपेल हे सांगता येणार नसल्याने लोकनियुक्त नसलेला व बळजबरीने बसलेला प्रशासक पुढे अनेक दिवस काम करून ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान करणार आहे असे मत  पुरुषोत्तम घोगरे पाटील संस्थापक राज्याध्यक्ष, सरपंच संघटना यांनी  व्यक्त केले आहे. 

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारे ग्रामपंचायती सारख्या स्वायत्त व घटनात्मक संस्थेवर असंसदीय, त्रयस्थ, कायद्याच्या कुठल्या चौकटीत नसणाऱ्या व्यक्तीला योग्य व्यक्ती ठरवून त्याला प्रशासक नेमण्याचा अतिशय चुकीचा, उथळ, बेकायदेशीर निर्णय ग्रामीण विकासावर वाईट परिणाम करणारा ठरेल. यात उभ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे नुकसान होईल. ज्या कुणा अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या सुपीक डोक्यातून हि नापीक कल्पना आली त्यांना याचा काही फरक पडणार नाही.

सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या क्षमता निर्माण करून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांच्या इतिहासातला सर्वात वाईट निर्णय म्हणून या निर्णयाची नोंद होईल.