10 जुलैला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे " वीज बिल वापसी आंदोलन #vidarbha-rajya-amdoln-समिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

10 जुलैला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे " वीज बिल वापसी आंदोलन #vidarbha-rajya-amdoln-समिती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -         

लॉक डाउन काळात दिनांक 24 मार्च 2020 पासून सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे सर्व वीज बिल माफ माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी दिनांक 10 जुलै 2020 ला विदर्भ राज्य आंदोलन समिती "वीज बिल वापसी " आंदोलन करणार आहे. समितीचे कार्यकर्ते व नागरिक विद्युत विभागाच्या कार्यालयात जाऊन आपले भरमसाठ आलेले वीज बिल परत करणार आहे.
           
लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करावे, दोनशे युनिट पर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा, विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरिता सरासरी साडे सात रुपये बिलाची आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता 11.50 रुपये दर आकारले जातात. ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावे, गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे शेती पंपाचे सर्व थकीत वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, मागेल त्याला तात्काळ वीज पुरवठा करण्यात यावा आणि विदर्भातील लोडशेडींग संपविण्यात यावे, या मागण्यासाठी आंदोलन होणार आहे.
             
हे  "वीज बिल वापसी आंदोलन " दिनांक 10 जुलै 2020, रोज शुक्रवारला विदर्भातील 11 जिल्हे व 120 तालुक्यात दुपारी 12 वाजता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात होणार असून सर्व वीज ग्राहकांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत समितीचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप, अरुण नवले, बंडू राजूरकर, रमाकांत मालेकर,अविनाश मुसळे , पद्माकर मोहितकर, सुभाष तुरानकर, अब्दुल रहमान, भुमन्‍ना चुकाबोटलावार, गजानन पत्रीवार, गजानन राजूरकर,  प्रमोद उराडे आदींनी केले.